नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीमध्ये ४ दिवस मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात ४५ लोक ठार असून मृताचा आकडा वाढतच आहे. आज पुन्हा कालव्यात 3 जणांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. एक मृतदेह गोकुळपुरीमधून तर इतर 2 मृतदेह भगीरथीविहार कालव्यामध्ये आढळले आहेत. अद्याप त्याची ओळख पटली नाही.
पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४५ झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत १६७ गुन्हे दाखल केले आहेत तर, ८८५ जणांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आली असली तरी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बाबरपूर, मौजापूर, जाफराबाद येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.