ETV Bharat / bharat

बिहारमधील अमरपूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन भावांचा मृत्यू; शहरात भीतीचे वातावरण

बांका जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अमरपूर शहरातील तीन भावांचा 15 दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला. तिघांचीही कोरोना चाचणी केलेली नव्हती.

author img

By

Published : Jul 25, 2020, 12:25 PM IST

Govt officer visit amarpur
अमरपूर मध्ये अधिकाऱ्यांनी पाहणी केली

बांका(बिहार) - जिल्ह्यातील अमरपूर भागातील एकाच कुटुंबातील तीन भावांचा 15 दिवसांत मृत्यू झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने हा परिसर सील केला आहे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत.

रॅपिड टेस्टिंग सुरु -

कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होत असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. डॉ. अभय प्रकाश यांच्या प्रयत्नांतून रॅपिड टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे. शहरातील 88 लोकांची चाचणी करण्यात आली त्यात 1 जण पॉझिटिव्ह आढळला.

अमरपूरमधील हटिया भागात टोला वार्ड-13 मागील दहा दिवसांपूर्वी दोन भावांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी त्यांच्या आणखी एका भावाचा मृत्यू झाला. एका मेडिकल व्यावसायिकाचा देखील मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्याधिकारी सुनील कुमार साह, पोलीस स्टेशन प्रमुख कुमार सन्नी, नगराध्यक्ष नीलम श्वेता, यांच्यानेतृत्वाखाली परिसर सील करण्यात आला. अमरपूर शहर सॅनिटाईझ करण्यात आले. यानंतर परिसरात कंटेंनमेंट झोन जाहीर करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.