नवी दिल्ली - 'इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नुसार लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत दहा स्थानांनी घसरून 51व्या स्थानावर आला आहे. त्यावरून काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'खरे तर सत्तेमध्ये असलेले लोकच तुकडे-तुकडे गँगचे सदस्य आहेत', असे चिदंबरम म्हणाले.
-
Anyone who has closely observed the events of the last two years knows that democracy has been eroded and democratic institutions have been debilitated those who are in power are the real ‘tukde tukde’ gang.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Anyone who has closely observed the events of the last two years knows that democracy has been eroded and democratic institutions have been debilitated those who are in power are the real ‘tukde tukde’ gang.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 23, 2020Anyone who has closely observed the events of the last two years knows that democracy has been eroded and democratic institutions have been debilitated those who are in power are the real ‘tukde tukde’ gang.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 23, 2020
लोकशाही निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीत भारत दहा स्थानांनी घसरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजकीय घटनांवर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हे लक्षात येईल की, लोकशाही आणि लोकशाहीतील संस्थांना शक्तीहीन करण्यात आले आहे. सत्तेमध्ये असलेले लोकच तुकडे-तुकडे गँगचे सदस्य आहेत. ज्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. ही वाटचाल पाहून प्रत्येक भारतीयाला चिंता करण्याची गरज आहे, असे चिंदबरम यांनी टि्वटमध्ये म्हणाले.
द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने (ईआययू) जारी केलेल्या लोकशाही निर्देशांक क्रमवारीतून जगातील विविध देशांमधील लोकशाही राज्यव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या निर्देशांकात भारताचे स्थान 10 अंकांनी घसरले असून 51 व्या स्थानी आले आहे. या क्रमवारीत भारताला 6.90 गुण मिळाले आहेत.
दरम्यान देशात घटते नागरी स्वातंत्र्य हे यामागील मुख्य कारण असल्याचेदेखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 2018 मध्ये भारताला मिळालेले गुण 7.23 होते. निवडणूक प्रक्रिया, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती, आणि नागरी स्वातंत्र्य या निकषांच्या आधारे हे गुण दिले जातात.