ETV Bharat / bharat

शेतकरी आणि बेरोजगारांच्या न्यायासाठी महाआघाडीला मतदान करा : राहुल गांधींचे आवाहन

शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांच्या न्यायाची वेळ आहे. त्यासाठी जनतेने महाआघाडीला मतदान करावे, असे आवाहन राहुल गांधींनी ट्विट मधून केले आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी
author img

By

Published : Oct 28, 2020, 11:55 AM IST

नवी दिल्ली - बिहारमधील शेतकरी आणि बेरोजगारांसाठी मतदान करण्याचे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधींनी मतदारांना केले आहे. शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांच्या न्यायाची वेळ आहे. त्यासाठी जनतेने महाआघाडीला मतदान करावे, असे आवाहन राहुल गांधींनी ट्विट मधून केले आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे.

  • इस बार न्याय, रोज़गार, किसान-मज़दूर के लिए
    आपका वोट हो सिर्फ़ महागठबंधन के लिए।

    बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ।#आज_बदलेगा_बिहार

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये पहिल्या टप्प्पयातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. 16 जिल्ह्यांमधील 71 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल. यामध्ये 1 हजार 66 उमेदवारांचे नशीब मशीनबंद होणार आहे. तर 14 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानासाठी 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात सभा घेणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी दोन ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम चंपारणमधील वाल्मीकीनगर आणि दरभंगामधील कुशेश्वरस्थानचा समावेश आहे.

कोणता पक्ष किती जागेवर लढवत आहे निवडणूक -

पहिल्या टप्प्यातील निवडणूकीत ७१ जागेसाठी मतदान होत आहे. यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष ३५ जागेवर निवडणूक लढवत आहे. तर नितीश यांचा सहकारी पक्ष भाजपाने २९ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत. विरोधी पक्षाचे सांगायचे झाल्यास राजद ४२ तर काँग्रेस २० जागेवर लढत देत आहे. याशिवाय चिराग पासवान यांचा लोकशक्ती पक्षाने ४१ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.