ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा : तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार - Third phase of bihar vidhan sabha

बिहार विधानसभेच्या ७८ जागांसाठी आज (शनिवार) निवडणूक होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. हा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा असून १० तारखेला निकाल लागणार आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 7, 2020, 4:36 AM IST

पाटणा - बिहार विधानसभेच्या ७८ जागांसाठी आज (शनिवार) निवडणूक होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. हा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून निकाल लागणार आहे. आज १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघात मतदान होणार आहे. यातील चार मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ४ पर्यंतच मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात १ हजार २०४ उमेदवार रिंगणात आहेत.

मतदानाची तयारी पूर्ण

पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिकीनगर, राजनगर तसेच सहरसा मधील सिमरी बख्तियारपूर आणि महिषी येथील मतदारसंघात सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून कर्मचाऱ्यांसह ईव्हीएम मशिन आणि इतर साहित्य मतदान केंद्रांवर पोहचले आहे. कोरोना नियमावलीचे पालन करत मतदान पार पडणार आहे.

निमलष्करी दलासह हेलिकॉप्टरद्वारे निगराणी

तिसऱ्या टप्प्यात ३३ हजार ७८२ बूथ असणार असून ईव्हीएमद्वारे मतदान होणार आहे. बुथ एवढ्या संख्येचे नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरद्वारेही मतदान प्रक्रियेवर निगराणी ठेवण्यात येणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यातील मतदारसंघ

तिसऱ्या टप्प्यात पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सीमामढी, मधुबनी, सुपौल, अररिया, मधेपुरा, किशनगंज, पूर्णिया, कटीहार, सहरसा, दरभंगा, मुजफ्फरपूर, वैशाली आणि समस्तीपूर जिल्ह्यातील ७८ जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक प्रचार संपला असून आचारसंहित लागू आहे.

पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण

बिहार विधासनभा निवडणुकीतील पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला पार पडला. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ मतदार संघासाठी मतदान झाले. यात 53.53% टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला पार पडले. दुसऱ्या टप्प्यात ९४ जागांवर मतदान झाले. यावेळी ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.