ETV Bharat / bharat

पक्षाने आपल्या मुलाविरुध्द केलेली कारवाई मान्य असेल - कैलास विजयवर्गीय

भाजपने आपल्या मुलाविरुद्ध कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी दिली आहे.

कैलास विजयवर्गीय
author img

By

Published : Jul 5, 2019, 10:02 AM IST

नवी दिल्ली - अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणारे आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मोदी हे आमचे नेते असून आम्ही सर्व पक्षाचे सेवक आहोत. त्यामुळे भाजपने आपल्या मुलाविरुद्ध कारवाई करावी, असे पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

आकाश विजयवर्गीय यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्या वर्तणुकीबाबत स्पष्टीकरण मागवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आमदार आकाश विजयवर्गीय यांनी केलेल्या मारहाणीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. कोणाचाही मुलगा असो, शिस्तभंग चालणार नाही, असे मोदींनी आकाश यांचे नाव न घेता म्हटले होते.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.