धुबरी- भारत-बांगलादेश सीमाभागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याभागात नागरीकांचे अवैध स्थलांतर तसेच गायीची तस्करी वा़ढली आहे. या प्रकरणी गुन्हेही नोंदवले आहेत मात्र हा परिसर अवैध गायींची तस्करी आणि बांगलादेशी नागरिकांच्या स्थलांतरणासाठी केंद्रस्थान बनले आहे.
येथील धुबरी जिल्ह्यात याप्रकरणी यावर्षी 62 गुन्हे नोंदविण्यात आले असून तीन अवैध स्थलांतरितांनाही अटक करण्यात आली आहे. दक्षिण सल्मारा जिल्ह्यात गायींची तस्करी करणाऱ्या 76 जणांना 1109 गायींसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील 40 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या भागाची सुरक्षा 6 बीएनबीएसएफ द्वारे पाहिली जाते. त्यात 178 बीएनबीएसएफ जवान आहेत. मात्र हा परिसर अवैध गायींची तस्करी आणि बांगलादेशी नागरिकांच्या स्थलांतरणासाठी केंद्रस्थान बनले आहे.