ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशन : श्रीलंकेत अडकलेले 685 भारतीय मायदेशी दाखल

author img

By

Published : Jun 2, 2020, 1:59 PM IST

भारत सरकारने वंदे भारत मिशन अंतर्गत ऑपरेशन समुद्रसेतू योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत विदेशात अडकलेल्या भारतीयांना जहाजातून मायदेशी आणले जात आहे.

Vande Bharat mission
वंदे भारत मिशन

तुटिकोरिन (तामिळनाडू) - श्रीलंकेत अडकलेल्या 685 भारतीयांची नौसैनेकडून सुटका करण्यात आली आहे. भारताच्या नौसेनेचे आयएनएस जलाश्व हे जहाज व्हीओ चिदंबरनार‌ बंदरात तुटिकोरिन येथे आज सकाळी दहा वाजता पोहोचले.

जहाजावरील प्रवासी टप्प्याटप्प्याने उतरणार आहेत. यामध्ये सुरुवातीला दिव्यांग त्यानंतर महिला जहाजामधून उतरणार आहेत. ‌सर्व प्रवाशांची बंदरावर वैद्यकीय चाचणी होणार आहे.

जहाजावर 557 पुरुष आणि 128 महिला आहेत. यामध्ये सात मुलांचा समावेश आहे, तर 36 वृद्ध पुरुष आणि 15 वृद्ध महिलांचा समावेश आहे. जहाजावरील चार जणांना ताप असल्याने त्यांना जहाजावरून उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

घरी परतत असल्याने खूप आनंद वाटत असल्याचे जहाजावरील एका प्रवाशाने सांगितले. हा प्रवास खूप आनंददायी होता. आम्हाला परत आणल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे कृतज्ञ असल्याचे या प्रवाशाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.