बंगळुरू - कर्नाटकच्या मंगळुरू विमानतळावर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये स्फोटके आढळून आली होती. त्या बॅगेला उघड्या मैदानात नेऊन ती स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.
-
#WATCH The Improvised explosive device (IED) recovered from a bag at Mangaluru airport earlier today, defused in an open field. #Karnataka pic.twitter.com/46fho4SbFY
— ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH The Improvised explosive device (IED) recovered from a bag at Mangaluru airport earlier today, defused in an open field. #Karnataka pic.twitter.com/46fho4SbFY
— ANI (@ANI) 20 January 2020#WATCH The Improvised explosive device (IED) recovered from a bag at Mangaluru airport earlier today, defused in an open field. #Karnataka pic.twitter.com/46fho4SbFY
— ANI (@ANI) 20 January 2020
कर्नाटकच्या मंगळुरू विमानतळावर दुपारी एक बेवारस बॅग आढळली होती. यामध्ये बॉम्ब असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने त्या बॅगच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच, मंगळुरूचे पोलीस आयुक्त पी. एस. हर्षा हे तातडीने आपल्या पथकासह विमानतळावर दाखल झाले होते. बॉम्ब विरोधी पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने लगेचच या बॅगची तपासणी करण्यात आली.
या बॅगमध्ये स्फोटके असल्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना याठिकाणापासून दूर ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. यासोबतच परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सायंकाळी या बॅगला निर्जन स्थळी नेऊन त्यातील स्फोटके निकामी करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास करताना, पोलीसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासली होती. त्यामध्ये दोन संशयित हे रिक्षामधून विमानतळावर येऊन, ती बॅग तिथे ठेवताना दिसून येत आहेत. पोलिसांनी त्यांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
हेही वाचा : मुझफ्फरपूर प्रकरण : ब्रजेश ठाकूरसह १९ आरोपी दोषी; २८ जानेवारीला होणार शिक्षेबाबत सुनावणी..