ETV Bharat / bharat

हिंदू संस्कृतीमुळेच मुस्लिमांना भारतामध्ये सुरक्षीत वाटते - मोहन भागवत - Mohan Bhagwat in odisa

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आम्ही कुणाचा ही द्वेष करत नसून संघाचा उद्देश्य फक्त हिंदु समाजाला नाही तर संपूर्ण देशाला संघटित करणे आहे.

मोहन भागवत
author img

By

Published : Oct 13, 2019, 1:09 PM IST

नवी दिल्ली - हिंदू संस्कृतीमुळेच मुस्लिमांना भारतामध्ये सुरक्षीत वाटते. आम्ही कुणाचाही द्वेष करत नसून संघाचा उद्देश्य फक्त हिंदु समाजाला नाही तर संपूर्ण देशाला संघटित करणे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. भूवनेश्वरमध्ये आयोजित संघाच्या सभेमध्ये ते बोलत होते.

  • Mohan Bhagwat, RSS: ...Maare-maare Yahudi (Jews) firte they akela Bharat hai jahan unko ashray mila. Parsion (Parsis) ki puja aur mool dharma sukrakshit kewal Bharat mein hai. Vishwa mein sarvadhik sukhi Musalman, Bharat mein milega. Ye kyun hai? Kyunki hum Hindu hain..." (12.10) pic.twitter.com/btO3Zdixgz

    — ANI (@ANI) October 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

समाजाला एकत्र करणे आवश्यक आहे आणि सर्व वर्गाने एकत्र यायला हवे आणि आरएसएस या दिशेने काम करत आहे. संस्कृती, भाषा, भौगोलिक स्थानामध्ये विविधता असूनही भारतीय लोक स्वत:ला एक मानतात. या एकजुटीच्या अद्वितीय भावनेमुळे मुस्लीम, पारशी इत्यादी धर्मातील लोकांना देशात सुरक्षित वाटते. पारशी भारतात सुरक्षित आहेत आणि मुस्लीमही आनंदी आहेत, असे भागवत म्हणाले.

हेही वाचा - बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; अपहरणाच्या संशयातून महिलेला मारहाण करुन जिवंत जाळले

समाजात बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तनात महत्वाची भूमिका बजावू शकणारी उत्कृष्ट माणसे निर्माण करणे हाच योग्य मार्ग आहे. कारण 130 कोटी लोकांना एकत्र बदलणे शक्य होणार नाही. समाजातील बदल घडवून आणणे आवश्यक आहे, जेणेकरुन देशाचे भाग्य बदलले जाईल आणि यासाठी शुद्ध चरित्र असणारा व प्रत्येक रस्ता व शहरात नेतृत्व करण्यास सक्षम असा माणूस तयार करणे आवश्यक आहे, असेही भागवत म्हणाले.

मोहन भागवत ९ दिवसांच्या ओडिशा दौर्‍यावर आहेत. अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीस उपस्थित राहतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीची बैठक 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान येथील खासगी विद्यापीठात आयोजित केली जाणार आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणुकांच्या नऊ दिवस आधी काँग्रेसला धक्का; दोन नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.