ETV Bharat / bharat

काश्मिरात दहशतवादी तळ उद्ध्वस्त; चिनी बनावटीचे ग्रेनेड, पिस्तुलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

मागील काही दिवसांपासून काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. त्याअंतर्गत ही शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

जप्त केलेली शस्त्रास्त्रे
जप्त केलेली शस्त्रास्त्रे
author img

By

Published : Jul 4, 2020, 3:15 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील थानामंडी भागातील दर्दसन या खेडेगावात ही कारवाई केली.

मागील काही दिवसांपासून काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. त्याअंतर्गत ही शोधमोहिम हाती घेण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

सुरक्षा दलांना दोन चिनी बनावटीची पिस्तुले, दोन मॅग्झिन, अंडर बॅरल ग्रेनेड लाँन्चर, 11 रायफल ग्रेनेड्स, एके 47 रायफल्सची 11 मॅग्झिन म्हणजेच 920 राऊंड आणि चिनी बनावटीची ग्रेनेड आढळून आली. तसेच आयईडी बॉम्ब बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये बॅटरी, वायर जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरक्षा दलांनी जून महिन्यात विविध दहशतवादी विरोधी कारवाया केल्या. त्यात 48 दहशतवादी ठार झाले, ठार झालेल्यांमध्ये अनेक कमांडरचाही सामवेश आहे. 2020 मध्ये आत्तापर्यंत 128 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानात दहशतवादी तळ अ‌ॅक्टिव्ह असून तेथील दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसांत असे अनेक प्रयत्न सुरक्षा दलांनी उथळून लावले आहेत, आणि पुढेही लावू. स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेत जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग मागील आठवड्यात म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.