श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) - पोलीस आणि सैन्यदलाने राबविलेल्या संयुक्त मोहिमेत दहशतवाद्यांची लपण्याची जागा उद्धवस्त केली आहे. दहशतवाद्यांनी पुंछ जिल्ह्यातील कालाबन जंगलात लपण्यासाठी व शस्त्रे लपविण्यासाठी जमिनीखाली जागा तयार केली होती.
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लपविण्यासाठी तयार केलेल्या जागेतून शस्त्रे व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई २७ आणि २८ ऑक्टोबरला करण्यात आली आहे. यामध्ये एके-५६, तीन काडतुसे, रेडिओ सेट, पाकिस्ताननिर्मित पिस्तूल, पिस्तुलाचे काडतुस, सौरचार्जर आदी वस्तू जप्त केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी सैन्यदलाकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे.