श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यामध्ये काल (गुरुवारी) दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या दोन ट्रकवर गोळीबार केला. या घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. जिल्ह्यातील चित्रग्राम येथे ही घटना घडली. काश्मीरातील व्यापार आणि व्यवसाय ठप्प करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी सफरचंदानी भरलेल्या ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ट्रक चालकाची गोळ्या घालून हत्या करुन ट्रक पेटवून देण्यात आला होता. त्यावेळी चालकाचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. दहशतवादी व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
Jammu and Kashmir: Two people died while one was left injured after terrorists fired at two trucks near Chitragam of Shopian yesterday. pic.twitter.com/PEnWOQZPjz
— ANI (@ANI) October 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jammu and Kashmir: Two people died while one was left injured after terrorists fired at two trucks near Chitragam of Shopian yesterday. pic.twitter.com/PEnWOQZPjz
— ANI (@ANI) October 25, 2019Jammu and Kashmir: Two people died while one was left injured after terrorists fired at two trucks near Chitragam of Shopian yesterday. pic.twitter.com/PEnWOQZPjz
— ANI (@ANI) October 25, 2019
दहशतवाद्यांनी मागील महिन्यामध्ये सफरचंदाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्यांच्या घरावर देखील हल्ला केला होता. काश्मीरची स्वायतत्ता काढून घेतल्यापासून काश्मीर खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अनेक ठिकाणी लष्कराचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचे करण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत.