ETV Bharat / bharat

तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण - तेलंगाणा कोरोना अपडेट

तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच झळ आता गृहमंत्र्यांना देखील पोहोचली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचा एक नातेवाईक देखील बाधित झाला आहे. गृहमंत्र्यांबाबत विचारले असता सरकारमधील कोणीही बोलायला तयार नाही.

telangana state home minister Mahmood Ali  telangana corona update  telangana corona positive cases  telangana state home minister corona positive  तेलंगाणा कोरोना अपडेट  तेलंगाणा गृहमंत्री कोरोना पॉझिटिव्ह
तेलंगाणा गृहमंत्री
author img

By

Published : Jun 29, 2020, 1:34 PM IST

Updated : Jun 29, 2020, 1:46 PM IST

हैदराबाद - तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद अली यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सुरक्षारक्षकांमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गृहमंत्र्यांना लागण झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच झळ आता गृहमंत्र्यांना देखील पोहोचली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचा एक नातेवाईक देखील बाधित झाला आहे. गृहमंत्र्यांबाबत विचारले असता सरकारमधील कोणीही बोलायला तयार नाही.

गेल्या २४ तासांत ९८३ कोरोनाचे नवे रुग्ण -

गेल्या २४ तासांत तेलंगणामध्ये कोरोनाचे ९८३ नवे रुग्ण सापडले. यापैकी ८१६ रुग्ण एकट्या हैदराबादेतील आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ४१९ वर पोहोचली आहे. तसेच चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २४७ वर पोहोचली आहे. तसेच आज २४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ५ हजार १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jun 29, 2020, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.