ETV Bharat / bharat

तेलंगणा: नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या खोकल्याच्या औषधाची अल्पवयीन मुलांना विक्री - अनधिकृत औषध विक्री

पोलिसांनी CODIMAXX या खोकल्याच्या औषधाच्या 90 बाटल्या आणि U-LINTUS या औषधाच्या 64 बाटल्या जप्त केल्या आहेत. ही दोन्हीही औषधे खोकल्यावर उपचार म्हणून वापरण्यात येतात. मात्र, त्यास डॉक्टरांची परवानगी बंधनकारक आहे.

जप्त केलेल्या बाटल्या
जप्त केलेल्या बाटल्या
author img

By

Published : Aug 8, 2020, 5:16 PM IST

हैदराबाद - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकण्यास बंदी असलेले खोकल्याचे औषध अनधिकृतपणे विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद शहरातील गोशामहल भागातील दारुसलेम येथील अगरवाल फार्मसीच्या दुकानावर पोलीस पथकाने कारवाई केली. या व्यक्तीने अनेक अल्पवयीन मुलांना आणि इतरांना खोकल्याचे औषध विकल्याचे समोर आले आहे. या औषधाचा वापर नशा म्हणूनही करण्यात येतो. तसेच त्याचे व्यसन लागून शरीरावर वाईट परिणाम होतात.

शहरातील मध्य पोलीस विभागाच्या टास्क फोर्सने गुप्त माहितीच्या आधारे ही कारावाई केली. पोलिसांसोबत औषध विभागाचे अधिकारीही होते. जयंत अगरवाल या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय जास्त किमतीला हे औषध त्याने अनेक अल्पवयीन मुलांना आणि व्यक्तींना विकल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी खोकल्याच्या औषधाच्या 90 बाटल्या आणि U-LINTUS या औषधाच्या 64 बाटल्या जप्त केल्या आहेत. ही दोन्हीही औषधे खोकल्यावर उपचार म्हणून वापरण्यात येतात. मात्र, त्यास डॉक्टरांची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, तरीही या मेडिकलमधून खोकल्याच्या औषधाची विक्री जास्त किमतीला सुरु होती.

या दोन्ही खोकल्याच्या औषधाचा वापर नशा करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच याचे व्यवसनही लागते. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून या औषधाचे सेवन सुरु असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारावाई केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.