हैदराबाद - पोहण्यासाठी गोदावरी नदीत उतरलेल्या चार तरुणांचा तेलंगणात मृत्यू झाला आहे. मुलुलू जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल (शनिवार) सायंकाळी ही घटना घडली.
वाढदिवस साजरा करण्यास गेले असता घडली घटना
तुम्मा कार्तिक (19), सानके श्रीकांत (२०), कोदिरिक्कला अन्वेश (२०) आणि रायवरापू प्रकाश अशी चौघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २० तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. त्यातील चार जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांचा बुडून मृत्यू झाला. व्यंकटापूरम विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली.