ETV Bharat / bharat

नावालाच शिक्षक..! आसाममध्ये ३ वर्षीय मुलीचा सुशिक्षित कुटुंबाकडून बळी देण्याचा प्रयत्न

पोलीस स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाच्या घरात पोहचले. यावेळी शिक्षकाच्या घरात लहान मुलीची बळीसाठी पुजा केली जात होती. यावेळी सर्वजण नग्नावस्थेत होते. एक तांत्रिक लांब तलवारीने मुलीचे शिर कापण्याचा प्रयत्न करत होता.

author img

By

Published : Jul 7, 2019, 2:12 PM IST

आसाम

उदलगुडी - आसाममध्ये उदलगुडी जिल्ह्यात शिक्षक आणि त्याच्या परिवाराने मिळून घरात ३ वर्षीय मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परंतु, स्थानिकांनी हस्तक्षेप करत पोलीस आणि माध्यमांना घटनेची माहिती देताना शिक्षक आणि त्याच्या कुटुंबाला मुलीचा बळी देण्यापासून रोखले.

मिळालेल्या माहितीनुसार, गणक्पारा गावात शिक्षकाच्या घरातून धूर निघताना स्थानिकांनी पाहिले. स्थानिकांना संशय आल्याने घटनेची माहिती पोलीस आणि माध्यमांना दिली. पोलीस स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाच्या घरात पोहचले. यावेळी शिक्षकाच्या घरात लहान मुलीची बळीसाठी पूजा केली जात होती. यावेळी सर्वजण नग्नावस्थेत होते. एक तांत्रिक लांब तलवारीने मुलीचे शिर कापण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, पोलीस आणि माध्यमांना हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर घरातील सदस्यांनी दगड आणि घरातील भांडी फेकायला सुरुवात केली. याबरोबरच मोटारसायकल, कार, टीव्ही आणि फ्रिजला आग लावली.

घटनेचा व्हिडिओ

पोलिसांनी स्थितीला नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार केला. यामध्ये शिक्षक आणि त्याचा मुलगा जखमी झाला. यादरम्यान, पोलिसांनी लहान मुलीची परिवाराच्या तावडीतून सुटका केली. ही मुलगी शिक्षकाच्या मेव्हणुची आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लहान मुलीच्या आई-वडीलांनीच बळी देण्यासाठी मुलीला शिक्षकाकडे सोपवले होते. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि शिक्षकाच्या परिवाराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

शिक्षक सहरिया जाधव विज्ञानाचा शिक्षक आहे. तर, त्याच्या मुलाने बंगळुरू येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. आरोपी महिला वैद्यकीय परिचारिका आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिक्षित असूनही ते समाजापासून लांब राहतात.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.