जमशेदपूर - टाटा स्टीलने लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा याकरता विविध विषयांवर २७ ई-लर्निंग कोर्सेसची सुरुवात केली आहे. या माध्यमातून ई-लर्निंग मोड्यूल होस्ट करणाऱ्या पोर्टलवर ३.६ लाखांपेक्षा जास्त यूजर्सनी नोंद केली आहे. तर दुसरीकडे ८ लाखांपेक्षा जास्त कोर्सचे लायसेंसही जारी करण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती देताना, टाटा स्टीलचे कॅपेबिलिटी डेव्हलपमेंटचे प्रमुख प्रकाश सिंह म्हणाले, सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर युवा विद्यार्थी तसेच कामाजी अशा अनेकांची मदत करण्याच्या उद्देशाने हे कोर्स सुरू करण्यात आले आहेत. या संदर्भात त्यांनी शिक्षा आणि विकासात्मक एकोसिस्टम तयार करण्यासाठी ई-लर्निंगची सुरुवात केल्याचे सांगितले.
तरुणांना भविष्यात उद्योग आणि विकासाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठीच्या उद्देशातून टाटा स्टीलच्या लर्निंग एंड डेवलपमेंट शाखा कॅपेबिलिटी डेवलपमेंट डिपार्टमेंटमध्ये या कोर्सला तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील प्रत्येक कोर्स हा फक्त १ रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कोर्समध्ये मॅकेनिकलपासून, इलेक्ट्लीकल, मेटलर्जी, वर्तमान औद्योगिक स्थितीसारख्या ४.०, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि मशीन लर्निंगसारखे विविधांगी विषय आहेत. या व्यतिरिक्त स्मार्ट क्लास आणि वेबिनारच्या माध्यमातून तांत्रिक आणि प्रायोगिक तत्वावरील विषयांसंबंधी सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.