ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये सारंकाही आलबेल नाही - यूसुफ तारिगामी

सीपीआय नेते यूसुफ तारिगामी यांनी काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक आहे, हा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. सोबतच, या मुद्याला आपण सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. काश्मीरमध्ये सध्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना नजरकैदेत ठेवले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर, तारिगामी हे माध्यमांशी संपर्क साधू शकलेले काश्मीरमधील पहिलेच नेते आहेत.

यूसुफ तारिगामी
author img

By

Published : Sep 18, 2019, 9:55 PM IST

नवी दिल्ली : सीपीआय नेते यूसुफ तारिगामी यांनी काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक आहे, हा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. सोबतच, या मुद्याला आपण सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सीपीआयचे अध्यक्ष सीताराम येचुरी यांना भेटल्यानंतर, घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. काश्मीरमध्ये सध्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना नजरकैदेत ठेवले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर, तारिगामी हे माध्यमांशी संपर्क साधू शकलेले काश्मीरमधील पहिलेच नेते आहेत.

काश्मीरमधली सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगार आहे. गेल्या ४० दिवसांपासून लोकांना रोजंदारी मिळत नाहीये. दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक. सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्यामुळे नोकरी असलेल्या लोकांना देखील आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास अडचण होत आहे. हे स्पष्ट आहे की सरकार जो आव आणत आहे, खरी परिस्थिती ही त्याच्या अगदी उलट आहे, असे यावेळी येचुरी यांनी सांगितले.

हेही वाचा : ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; पश्चिम बंगालच्या प्रश्नांवर चर्चा

सोबतच, येचुरी यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे आभार मानले. काश्मीर भेटीला परवानगी दिल्याबद्दल, आणि तारिगामी यांना एआयआयएमएस येथे उपचारासाठी येऊ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

तारिगामी यांनी बोलताना, मी फक्त तेच सांगणार आहे जे सामान्य काश्मीरी लोकांचे मत आहे, असे स्पष्ट केले. आम्ही काश्मीरमध्ये बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे. विभाजन, मृत्यू अशा सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. मात्र, आता जे चालू आहे, ते अतिशय खिन्न करणारे आहे. जम्मू आणि काश्मीरमधील जनतेची एकता, आणि काश्मीर-भारत संबंधांचे रक्षण करणे ज्यांचे कर्तव्य आहे, त्यांच्याकडूनच याला धोका निर्माण झालेला पाहणे हे धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले.

यासोबतच त्यांनी भारताच्या जनतेला, काश्मीरी लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले. भारतातील लोकांना इथली एकच बाजू दाखवली जात आहे. सामान्य काश्मीरी नागरिक मात्र, आपली बाजू मांडण्याची संधीच शोधत आहेत, असेही तारिगामी यांनी सांगितले.

हेही वाचा : हिंदीची सक्ती करावी असे म्हणलोच नव्हतो, अमित शाहांची कोलांटउडी

Intro:Body:

काश्मीरमध्ये सारंकाही आलबेल नाही : यूसुफ तारिगामी

नवी दिल्ली : सीपीआय नेते यूसुफ तारिगामी यांनी काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक आहे हा केंद्र सरकारचा दावा फेटाळून लावला आहे. सोबतच, या मुद्याला आपण सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सीपीआयचे अध्यक्ष सीताराम येचुरी यांना भेटल्यानंतर, घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. काश्मीरमध्ये सध्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना नजरकैदेत ठेवले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर, तारिगामी हे माध्यमांशी संपर्क साधू शकलेले काश्मीरमधील पहिलेच नेते आहेत.

काश्मीरमधली सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगार आहे. गेल्या ४० दिवसांपासून लोकांना रोजंदारी मिळत नाहीये. दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक. सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्यामुळे नोकरी असलेल्या लोकांना देखील आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यास अडचण होत आहे. हे स्पष्ट आहे की सरकार जो आव आणत आहे, खरी परिस्थिती ही त्याच्या अगदी उलट आहे. असे यावेळी येचुरी यांनी सांगितले.

सोबतच, येचुरी यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश रजन गोगोई यांचे आभार मानले. काश्मीर भेटीला परवानगी दिल्याबद्दल, आणि तारिगामी यांना एआयआयएमएस येथे उपचारासाठी येऊ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

तारिगामी यांनी बोलताना, मी फक्त तेच सांगणार आहे जे सामान्य काश्मीरी लोकांचे मत आहे असे स्पष्ट केले. आम्ही काश्मीरमध्ये बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे. विभाजन, मृत्यू अशा सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. मात्र, आता जे चालू आहे, ते अतिशय खिन्न करणारे आहे. जम्मू आणि काश्मीरमधील जनतेची एकता, आणि काश्मीर-भारत संबंधांचे रक्षण करणे ज्यांचे कर्तव्य आहे, त्यांच्याकडूनच याला धोका निर्माण झालेला पाहणे हे धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले.

यासोबतच त्यांनी भारताच्या जनतेला, काश्मीरी लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले. भारतातील लोकांना इथली एकच बाजू दाखवली जात आहे. सामान्य काश्मीरी नागरिक मात्र, आपली बाजू मांडण्याची संधीच शोधत आहेत. असेही तारिगामी यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.