ETV Bharat / bharat

तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती

author img

By

Published : Oct 29, 2019, 8:03 AM IST

Updated : Oct 29, 2019, 10:56 AM IST

सुजितचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह विघटित अवस्थेत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मृतदेह रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आला आहे.

चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

चेन्नई - तामिळनाडूमध्ये तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बोरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुजित विल्सन असे २ वर्षीय मुलाचे नाव असून तब्बल ८० तास चाललेल्या बचावकार्यानंतर त्याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सुजितचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह विघटित अवस्थेत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मृतदेह रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आला आहे.

  • J. Radhakrishnan,Principal Secretary,Transport Dept: The 2-year-old boy's body is now in decomposed state. We tried our best to rescue him but unfortunately foul smell has started coming from the borewell in which the child had fallen. As of now,digging process has been stopped. https://t.co/kuEgslufOV pic.twitter.com/daNnmVfPBQ

    — ANI (@ANI) October 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुजित २५ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खेळता-खेळता या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी अथकपणे बचावकार्य सुरू होते. मात्र, त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती. त्याचा मृतदेह विघटित अवस्थेत हाती आला आहे. बचावकार्य सुरू असताना ६५ फुटांपर्यंत खोदकाम केल्यानंतर सडलेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागली. यानंतर बचावकार्य थांबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. परिवहन विभागाचे मुख्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी मंगळवारी पहाटे ही माहिती दिली.

सुजितला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तीन दिवसांहून अधिक काळ बचावकार्य सुरू होते. त्याला बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी वैद्यकीय पथकही बोलावण्यात आले होते. तसेच, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचीही (एनडीआरएफ) सहा पथके सज्ज होती. मात्र, अखेर ही झुंज अपयशी ठरली.

Intro:Body:

तमीळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती

चेन्नई - तमीळनाडूमध्ये तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बोरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुजित विल्सन असे २ वर्षीय मुलाचे नाव असून तब्बल ८० तास चाललेल्या बचावकार्यानंतर त्याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सुजीतचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. चिमुकल्याचा मृतदेह विघटित अवस्थेत असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मृतदेह रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आला आहे.

---------------

तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह हाती

--------------

सुजीतला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी; तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह हाती

चेन्नई: जवळपास तीन दिवसांपासून बोरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या सुजीत विल्सनचा मृत्यू झाला आहे. सुजीतला वाचवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अथक प्रयत्न सुरू होते. तीन दिवसांपूर्वी बोरवेलमध्ये सुजीतचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. सुजीतच्या सुखरुप सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रार्थना केल्या होत्या. मात्र सुजीतला सुखरुप बाहेर काढण्यात अपयश आलं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच) 

Conclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 10:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.