चेन्नई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. यादरम्यानच, मदुराई येथे सांस्कृतिक कार्यक्रम जलीकट्टूच्या प्रसिद्ध वळूचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी, बैलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिल्यामुळे सोशल डिस्टन्ससिंग आणि लॉकडाऊनचे उल्लंघन झाले आहे.
अलंगानल्लूर येथील मुदुवरपट्टी गावातील चेलयई अम्मन मंदिराद्वारे हा वळू खेळवण्यात आला होता. याचे नाव 'मूली' असे होते. 12 एप्रिलला त्याचा खेळादरम्यान मृत्यू झाला. गावातील वरिष्ठ मंडळी आणि मंदिराच्या अधिकाऱ्यांनी या मृत बैलाच्या शरीराची सजावट केली. त्याला गावाच्या मध्ये ठेवण्यात आले होते. यावेळेस तब्बल दोन हजार लोक उपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे.
'जलीकट्टू' हा तमिळनाडूतील एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान एका वळूचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेत दोन हजार लोक सहभागी झाल्याची घटना घडली आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन जारी केला आहे. तरीही हा आदेश धुडकावून लावत इतकी मोठी गर्दी जमा झाली होती.
तमिळनाडूमध्ये आतापर्यंत 1 हजार 240 लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मदुराईमध्ये सुद्धा 40 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तरीही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग या बाबी पाळल्या न जाणे हे अत्यंत चिंताजनक आहे.
काय आहे जलीकट्टू?
जलीकट्टू हा तमिळनाडूचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वळूंना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. या खेळात सहभागी होणाऱ्या वळूंना मोठा मान असतो. येथील लोकांच्या श्रद्धेनुसार या बैलांना देवतांचा दर्जा दिला जातो.