ETV Bharat / bharat

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांना कोरोनाची लागण - lockdown in tamil nadu

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चेन्नईतील अलवारपेट या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. राजभवनातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने ते स्वत: रुग्णालयात दाखल झाले होते.

author img

By

Published : Aug 2, 2020, 6:02 PM IST

चेन्नई - तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजभवनातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर अलवारपेट या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. कोरोनाची चाचणी केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सध्या प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

मागील महिन्यात राजभवनातील जवळपास 84 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सुरक्षारक्षक, अग्निशमन दलातील कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. संपूर्ण राजभवन सॅनिटाईज करण्यात आले होते. राज्यपाल पुरोहितांना पुढील सात दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.