ETV Bharat / bharat

कोविड-19: स्वतः ला जपा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा!

जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीचा प्रश्न येतो, इतर सर्व गोष्टी मागे पडतात. संसर्गांच्या बाबतीत हे विशेष सत्य आहे. जर रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य रीतीने काम करीत असेल, तर कोणतेही अँटीजेन शरीरावर हल्ला करु शकत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. वयोवृद्ध लोकसंख्येत या रोगाची तीव्रता जास्त आहे. यामुळे, सर्वांचे लक्ष रोगप्रतिकारक शक्तीकडे लागले आहे. खरंतर, आईच्या उदरात असल्यापासून ही शक्ती योग्य रीतीने विकसित करीत असते.

author img

By

Published : Apr 18, 2020, 5:49 PM IST

कोविड-19: स्वतःला जपा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा!

आपण श्रद्धाळूपणे हात धूत आहोत. आपण व्हॅम्पायर स्नीझ अर्थात शिंकताना एखाद्या व्हॅम्पायरप्रमाणे कोपऱ्यापासून दुमडलेला हात समोर ठेवण्याच्या नियमाचे पालन करीत आहोत. आपण आपल्या चेहऱ्यांना स्पर्श करत नाही. आपण मास्क घालीत आहोत आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करीत आहोत. एक किंवा दोन नाही, तर कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण शेकडो उपाययोजना करीत आहोत. मात्र, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतः च्या रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करणे. एकीकडे ही महामारी अनेकांचे प्राण आणि उपजीविकांवर हल्ला करीत आहे, आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वेळोवेळी बदल घडत असतो. वयानुसार, आपल्या शरीरातील रोगप्रतिकार कार्ये कमी होऊ लागतात.

जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीचा प्रश्न येतो, इतर सर्व गोष्टी मागे पडतात. संसर्गांच्या बाबतीत हे विशेष सत्य आहे. जर रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य रीतीने काम करीत असेल, तर कोणतेही अँटीजेन शरीरावर हल्ला करु शकत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. वयोवृद्ध लोकसंख्येत या रोगाची तीव्रता जास्त आहे. यामुळे, सर्वांचे लक्ष रोगप्रतिकारक शक्तीकडे लागले आहे. खरंतर, आईच्या उदरात असल्यापासून ही शक्ती योग्य रीतीने विकसित करीत असते.

इम्युनोग्लोब्युलिन्सद्वारे आईच्या गर्भाच्या वेष्टनातून (प्लॅसेंटा) अर्भकाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. आईच्या आरोग्याच्या स्थितीवर, तिला पुर्वी झालेले रोग आणि मिळालेल्या लसीकरणावर ही गोष्ट अवलंबून आहे. काही इम्युनोग्लोब्युलिन्स हे स्तनपानाच्यावेळी बाळापर्यंत पोहोचतात. याद्वारे मिळालेली रोगप्रतिकारक शक्ती काही महिने टिकून राहते. आतड्यातील संसर्ग, लसी आणि जीवाणू नैसर्गिक रोगप्रतिकारक यंत्रणा निर्माण करतात. मात्र, वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते, याची सुरुवात पौगंडावस्थेपासून होते. साठीमध्ये हा ऱ्हास जलद आणि वेगवान होतो. मात्र, चांगली गोष्ट अशी की, कोणतेही वय असो, काही लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि काहींची कमकुवत असते.

काही सोप्या गोष्टींचे पालन करुन, कोणीही आपली रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा वाढवू शकते. कोविड-19 हा आजार 1918 साली आलेल्या स्पॅनिश फ्लूनंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची महामारी मानली जाते. नव्या कोरोना विषाणूवर कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नसल्याने या विषाणूचे अस्तित्व अजून काही काळ टिकून राहणार आहे. म्हणून, आपली रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे महत्त्वाचे आहे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे हा एका दिवसाचा खेळ नाही. यासाठी सातत्य आवश्यक आहे. जर आपण सातत्याने प्रयत्न केले, तरच आपल्यासमोरील दीर्घ लढ्यात विजय शक्य आहे, हे लक्षात ठेवायलाच हवे.

हृद्योधिस्ष्ठ ग्रंथि (थायमस ग्लँड) रोगप्रतिकारक यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. छातीच्या हाडामागे याचे स्थान असते. याच ठिकाणी टी-लिम्फोसाइट्सना संसर्गाशी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लहान वयात सक्रिय असलेली थायमस ग्रंथी वयानुसार निष्क्रीय होत जाते. पौगंडावस्थेपासून सुरुवात होऊन, ही ग्रंथी दर वर्षाला 3 टक्क्यांनी कमी होते आणि म्हातारपणी पुर्णपणे नाहीशी होते. म्हणून म्हातारपणी नव्या संसर्गाचा सामना करणे अवघड जाते, त्याचे हे एक कारण आहे. लहान मुलांमध्ये कोविड-19 च्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे, त्याचे एक कारण म्हणजे थायमस ग्रंथी हे असू शकते.

रोगप्रतिकारक यंत्रणा ही शरीरातील दुसऱ्या क्रमांकाची जटील यंत्रणा आहे. शेकडो प्रकारच्या पेशी, जैविक संरचना आणि 8,000 जनुकांपासून ही यंत्रणा तयार झालेली असते. यामध्ये दोन स्तरावर संरक्षण तयार केले जाते. आपण ज्याच्यासह जन्माला आलो ती नैसर्गिक यंत्रणा. या प्रणालीद्वारे कोणत्याही परकीय घटकांचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांना मारुन टाकण्यासाठी लगेचच न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफेजेस तयार केले जाते. दुसरी आहे अनुकूल रोगप्रतिकारक प्रणाली. जेव्हा आपल्या शरीराचा सूक्ष्मजंतू किंवा सूक्ष्मजंतूंनी सोडलेली रसायनांशी संबंध येतो, तेव्हा ही यंत्रणा विकसित होते. यामध्ये टी सेल्स, बी सेल्स आणि अँटीबॉडीजचा समावेश असतो. हल्ला करण्यात त्यांची गती कमी असते. बी सेल्सनादेखील स्मरणशक्ती असते.

पूर्वी कोणत्या सूक्ष्मजंतूंनी शरीरास संसर्ग झाला होता, हे ते लक्षात ठेवतात आणि जर दुसऱ्यांदा हल्ला झाला त्या सूक्ष्मजंतूंना मारण्यासाठी अँटीबॉडीजची नियुक्ती केली जाते. इन्फ्ल्युएन्झासारखे विषाणू बी सेल्सना चुकवण्यासाठी त्यांच्या जनुकीय संरचनेत बदल करतात. नवा कोरोना विषाणूदेखील अशाच पद्धतीने काम करतो, रोगप्रतिकारक यंत्रणेवर भार टाकतो.

रोगप्रतिकारक यंत्रणेची स्थिती ढासळत आहे. यापासून काही लोकांना कसलाही धोका जाणवत नाही. खरंतर, पौगंडावस्थेपासून आपल्या रोगप्रतिकारकतेत हळुहळु घसरण होत जाते. आपल्या जीवनशैलीतील विविध पैलूदेखील या घसरणीस कारणीभूत ठरतात. बैठी जीवनशैली असणारे, सिगरेट किंवा मद्यपान करणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक यंत्रणा नेहमीपेक्षा कमी असते. सहसा, जेव्हा परकीय घटक शरीरात प्रवेश खरतात, न्युट्रोफिल्स (डब्लूबीसीचा प्रकार) पहिल्यांदा समोर येतात. संसर्गाशी सामना करण्यासाठी ते सायटोकिन्ससारखे एन्झाईम्स सोडतात. वयानुसार न्युट्रोफिल्सदेखील संभ्रमात पडते.

जुने न्युट्रोफिल्सचा कृती करण्याचा वेग कमी असतो. यामुळे, एकीकडे रोगप्रतिकारक प्रतिसादाचा वेग कमी होतो आणि दुसऱ्या बाजूला प्रज्वलन(इन्फ्लमेशन) वाढत जाते. न्यूट्रोफिलच्या कार्यातील बिघाडामुळे धोकादायक परिणाम होऊ शकतात. ते कार्यान्वित न्युट्रोफिमध्येदेखील अडथळा आणतात. त्यांना नियंत्रित करणाऱ्या एन्झाईम्सवर नियंत्रण मिळवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कोलेस्ट्रॉल कमी करणारे स्टेटिन हे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या एन्झाईमचे नियमन करण्यात उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, याचे काही दुष्परिणामदेखील होतात. म्हणून, नैसर्गिक मार्गांनीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे योग्य आहे. यासाठी काही मेहनत आवश्यक आहे. खरंतर, आपल्याला अपेक्षित असलेल्या सुदृढ आणि दीर्घकालीन आयुष्यापुढे ही मेहनत काहीच नाही.

व्यायाम केल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. हानिकारक जंतूंना लांब ठेवणाऱ्या पांढऱ्या पेशी आणि इम्युनोग्लोब्युलिन्स हे व्यायाम सुरु असताना शरीराच्या सर्व अवयवांमध्ये वेगाने पसरतात. दैनंदिन व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये न्युट्रोफिल्सचे कार्य अधिक प्रभावीपणे होते, या गोष्टीची नोंद घ्यावी. न्युट्रोफिल्स विषाणूंना पुर्णपणे रोखू शकत नाहीत. मात्र, विषाणूंपासून होणाऱ्या दुय्यम संसर्गांना आळा बसू शकतो. नव्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या हल्ल्यांमध्ये न्युमोनियाचा एकमेव मोठा धोका आहे. हा जिवाणूचा संसर्ग आहे, जो फुफ्फुसाच्या यंत्रणेला हानी पोहोचवतो. व्यायामामुळे थायमस बिघडण्याचा वेग कमी होतो. त्याचप्रमाणे, मायक्रोफेजेसचे उत्पादन वाढते, ज्यामुळे प्रज्वलनाच्या प्रक्रियेवर निर्बंध येतात. यामुळे, दिवसाला कमीत कमी 10,000 पावले चालणे गरजेचे आहे.

अन्न आपल्या आहारातून आपले व्यक्तिमत्त्व घडते. ही वेळ आता पोटातील प्रोबायोटिक जीवाणूंवर लक्ष केंद्रीत करण्याची आहे. जर आपले पोट सुदृढ असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती आणि आयुर्मान वाढते. दही किंवा ताकासारखे आंबवलेले पदार्थ आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूच्या वाढीसाठी योगदान देतात. फळे आणि भाज्यांचे आहारातील प्रमाण वाढवणे चांगले. पालेभाज्यांमधील फायबरमुळे चांगल्या जीवाणूला प्रोत्साहन मिळते, जो पुढे अँटीऑक्सिडंट्स आणि मायक्रोन्युट्रिअंट्सला प्रोत्साहन देतो. कढीपत्ता, पपई, पालक, लिंबूवर्गातील फळे, आले, लसूण, तिखट आणि हळददेखील रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत करण्यात सहाय्य करते.

उपवासकॅलरींचे सेवन कमी करुन आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. जे लोक नियमितपणे उपवास करतात त्यांच्याकडे शरीर तंदरुस्त, सुदृढ मानसिक आरोग्य आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते. कॅलरीचे सेवन कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास करता येईल. त्याचे काही प्रकार आहेत. उदाहरणार्थ, आपण दिवसातून 16 तास उपवास करु शकतो आणि उरलेल्या केवळ 8 तासांमध्ये खाऊ शकतो.

वजनावर नियंत्रण -

वजन मर्यादेपेक्षा जास्त असो वा कमी, यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. वयानुसार बी सेल्सची क्षमता कमी होत जाते. शरीरात अँटीबॉडीज पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत आणि लसीकरणास कमकुवत प्रतिसाद दिला जातो. लठ्ठपणामुळे अशाच प्रकारच्या समस्या निर्माण होतात, असे अभ्यासातून समोर आले आहे. कारण, अँटीबॉडीस प्रतिसाद देताना अॅडीपोज टिश्यू अर्थात मेदाची गती कमी होते. मधुमेहासारखे जीवनशैलीशी निगडीत आजार दूर सारण्यासाठी मध्यम प्रमाणात वजन राखणे महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नव्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक आहे.

जीवनसत्त्वे न्युट्रोफिल्सकडून येणारे अपुरे संकेत आणि प्रज्ज्वलनामुळे टी सेल्सच्या कार्याला धक्का पोहोचतो. ही त्रुटी दुरुस्त करण्यासआठी ई जीवनसत्त्व फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात (200 आययू) जीवनसत्त्वांचे सेवन केल्यास ज्येष्ठ नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. रोगप्रतिकारक यंत्रणेच्या संरक्षणात ड-जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे. पांढऱ्या पेशींचे कार्य प्रभावीपणे व्हावे यासाठी ते मदत करते. या जीवनसत्त्वाचा 1000 आययूएवढा डोस घेता येतो. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास टी सेल्सच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.

झिंक शरीरातील संरक्षणात्मक यंत्रणा योग्य रीतीने कार्य करण्यासाठी हे आवश्यक खनिज आहे. हे विषाणू संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, याच्या सेवनाची दैनंदिन मर्यादा ओलांडणे चांगले नाही. दररोज 50 मिलीग्रॅम प्रमाण पुरेसे आहे. चावून खाता येतील अशा झिंक सप्लिमेंन्ट्सचा पर्याय अधिक चांगला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.