ETV Bharat / bharat

'टीबी' रोगाची लस कोरोनावर परिणामकारक? - new delhi latest news

टीबीची लस कोरोनाविरुद्ध परिणामकारक ठरत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या विषयी संशोधकांनी सकारात्मक मते व्यक्त केली आहेत.

t-b-vaccine-is-effective-against-corona
'टीबी' रोगाची लस कोरोनावर परिणामकारक?
author img

By

Published : Apr 2, 2020, 7:14 PM IST

नवी दिल्ली - ज्या देशात क्षय रोगाची लस दिली जाते, त्या देशात कोरोना विषाणूचा परिणाम कमी जाणवत असल्याचे मत, अमेरिकेतल्या काही संशोधकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ही लस भारतात जन्मल्यानंतर लगेच लाखो लहान मुलांना दिली जाते. ही लस कोरोनाविरोधात प्रभावीपणे काम करते, असे संशोधकांचे मत आहे.

न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा अहवाल आहे, ज्यामध्ये इटली आणि अमेरिका यांचे उदाहरण देत राष्ट्रीय निर्णयानुसार बऱ्याच देशात दिली जाणारी टीबीची लस आणि कोरोना यांचा आपापसात संबंध सांगितला गेला आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेली 1 लाख 90 हजार प्रकरण समोर आली आहेत. या देशात 4 हजारपेक्षा जास्त लोकांंचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली 1 लाख 5 हजार प्रकरणे समोर आली असून बारा हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. नेदरलँडमध्ये 12 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली असून 1 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. क्षय रोगाची लस ही कोरोनाविरोधात प्रभावीपणे काम करू शकत असल्यामुळे मृत्यूची संख्या कमी असल्याचे, या संशोधकांनी सांगितले आहे.

भारतात क्षय रोगाची लस क्षयरोग प्रतिबंध कार्यक्रमाचा भाग असून ही लाखो लोकांना त्यांच्या जन्मानंतर दिली जाते. जगात सर्वात जास्त क्षय रोग असलेला देश झाल्यानंतर भारताने 1948ला क्षयरोग प्रतिबंध मोहीम सुरू केली होती. भारतीय तज्ज्ञांच्यामते ते याबंद्दल आशाबादी आहेत.

लवली प्रोफेशनल विद्यापीठ येथील पंजाब एप्लाईड मेडिकल सायन्सच्या डीन मोनिका गुलाटी म्हणाल्या, प्रत्येक छोटी गोष्ट आपल्याला आशेचा किरण दाखवत असते. मात्र, आताच काही बोलणे उतावळेपणाचे ठरेल. हे खरे आहे, की क्षय रोगाची लस सार्क विषाणूविरूद्ध प्रभावी होती. या विषाणूचा परिणाम क्षय रोगाची लस देणाऱ्या देशात कमी गंभीर आहे. ही लस दुसऱ्या कोरोना विषाणू विरुद्धसुद्धा प्रभावी ठरली आहे. यामुळे हा एक आशेचा किरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.