ETV Bharat / bharat

स्विस बँकेकडून ५० भारतीयांना मिळणार नोटीस, अपील करण्याची शेवटची संधी - पाऊल

स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी ५० भारतीय खातेधारकांना बँकेच्या नवीन सुचनेसबंधी नोटीस पाठवण्याची प्रकिया सुरू केली आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 16, 2019, 7:30 PM IST

नवी दिल्ली - स्विस बँकेने अघोषित खातेधारकांविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी ५० भारतीय खातेधारकांना बँकेच्या नवीन सुचनेसबंधी नोटीस पाठवण्याची प्रकिया सुरू केली आहे. स्वित्झर्लंड सरकारने देशाच्या प्रतिमेत सुधार करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

स्वित्झर्लंडने स्विस बँकेत पैसे ठेवणाऱया खातेधारकांविषयी माहिती देण्यासाठी भारत सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. स्वित्झर्लंडने असा करार अन्य देशांसोबतही केला आहे. यामुळे, स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी मार्चपासून आतापर्यंत जवळपास ५० भारतीय खातेधारकांना नोटीसा पाठवल्या आहेत. याबरोबरच भारत सरकारला सूचना देण्यापूर्वी खातेधारकांना अपील करण्याची एक संधी देण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडने यासोबतच खातेधारकांची काही माहितीही सरकारला दिली आहे. यामध्ये काही खातेधारकांची पूर्ण नावे न देता फक्त सुरुवातीची काही अक्षरे देण्यात आली आहेत, शिवाय जन्म तारखेचाही उल्लेख करण्यात आला आहे.

नावांची यादी खालीलप्रमाणे -

एएसबीके - २४ नोव्हेंबर १९४४, एबीकेआय - ९ जुलै १९४४, श्रीमती पीएस - २ नोव्हेंबर १९८३, श्रीमती आरएस - २२ नोव्हेंबर १९७३, एपीएस - २७ नोव्हेंबर १९४४, श्रीमती एडीएस - १४ ऑगस्ट १९४९, एमएलए - २० मे १९३५, एनएमए -२१ फेब्रुवारी १९६८, एनएमए -२७ जून १९७३. यामध्ये २ भारतीयांची पूर्ण नावे सांगण्यात आली आहेत. १९४९ साली जन्मलेले कृष्ण भगवान रामचंद आणि १९७२ मध्ये जन्मलेल्या कल्पेश हर्षद किनारावला यांचा समावेश आहे.

Intro:Body:

Nat 08

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.