नवी दिल्ली - राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक बेवारस बॅग आढळून आली आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या तपासणीत बॅगमध्ये आरडीएक्स(RDX) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा - २०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत
गुरुवारी रात्री उशिरा टर्मिनल ३ वर एक काळ्या रंगाची बॅग सीआयएसएफ सुरक्षा दलाला आढळून आली. त्यानंतर 'बॉम्ब डिस्पोजल' आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीमध्ये बॅगमध्ये आरडीएक्स असल्याचे निष्पण झाले आहे. मात्र, आरडीएक्स नक्की कशा पद्धतीने ठेवण्यात आले आहे, हे स्पष्ट झालेले नाही. बॉम्बसद्दश्य वस्तू आढळून आल्याने प्रवाशांना काही काळ विमानतळामध्ये येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
हेही वाचा - जम्मू-काश्मीर, लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन, नव्या नायब राज्यापालांनी घेतली शपथ
बॅगमधील संशयित वस्तू २४ तास निगराणी खाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच नक्की काही सांगता येईल. बॅगमध्ये बॉम्ब किंवा आयईडी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. संशयित बॅग सापडल्यानंतर सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांनी संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. त्यानंतर पहाटे ४ वाजता विमानतळ प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. याप्रकरणी तपास सुरू आहे.