नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाच्या चाचण्या मोफत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्देश दिले आहेत. सरकारी वा परवाना दिलेल्या खासगी प्रयोगशाळा या दोन्ही ठिकाणच्या चाचण्या मोफत असाव्यात, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
-
Supreme Court issued following interim directions to Centre: Tests relating to COVID19 whether in approved govt laboratories or approved private labs shall be free of cost,the Apex Court said and that Centre shall issue necessary directions in this regard immediately (1/3) pic.twitter.com/p7MPMEomzk
— ANI (@ANI) April 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Supreme Court issued following interim directions to Centre: Tests relating to COVID19 whether in approved govt laboratories or approved private labs shall be free of cost,the Apex Court said and that Centre shall issue necessary directions in this regard immediately (1/3) pic.twitter.com/p7MPMEomzk
— ANI (@ANI) April 8, 2020Supreme Court issued following interim directions to Centre: Tests relating to COVID19 whether in approved govt laboratories or approved private labs shall be free of cost,the Apex Court said and that Centre shall issue necessary directions in this regard immediately (1/3) pic.twitter.com/p7MPMEomzk
— ANI (@ANI) April 8, 2020
कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना भरपाई देणे शक्य आहे का? हे तपासून पाहा. हे शक्य झाल्यास नागरिकांना पैसे भरावे लागणार नाहीत, असे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस.रविंद्र भट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. आतापर्यंत भारतात 1 लाख 21 हजार 271 जणांची कोरोना चाचणी घेतल्याचे आयसीएमआरचे तज्ज्ञ आर गंगाखेडकर यांनी सांगितले आहे. भारतामध्ये 50 पेक्षा जास्त खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना इतके महागडे दर आकारण्याची परवानगी देऊ नका. सरकारकडून खासगी प्रयोगशाळांना भरपाई देण्यासाठी यंत्रणा तयार करा असा सल्ला न्यायालयाने दिला आहे.