ETV Bharat / bharat

विधानसभा अध्यक्षांसमोर हजर व्हा, राजीनामा देणाऱ्या कर्नाटकच्या आमदारांना 'सर्वोच्च आदेश'

अध्यक्ष रमेश कुमार राजीनामे संमत करण्यास विलंब करत आहेत, या कारणाने बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

'सर्वोच्च आदेश'
author img

By

Published : Jul 11, 2019, 12:00 PM IST

Updated : Jul 11, 2019, 3:47 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या सर्व बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या कार्यालयात संध्याकाळी ६ पर्यंत हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. तसेच, त्यांच्या अर्जावरील उद्याची सुनावणी स्थगित केली आहे.

न्यायालयाच्या निर्देशांनुसार, राजीनामा दिलेले सर्व आमदार बंगळुरुला जाण्यासाठी विमानाने रवाना होणार आहेत. त्यासाठी सर्वजण छत्रपती शिवाजी आंतरराराष्ट्रीय विमानताळावर पोहोचले आहेत. त्यांना संध्याकाळी ६ वाजण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची भेट घेणे आवश्यक आहे.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार राजीनामे संमत करण्यास विलंब करत आहेत, या कारणाने बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष कुमार यांनी 'मी राजीनामा देणाऱ्या आमदारांना माझ्यासमोर हजर होण्यास सांगितले होते. त्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, ते माझ्यासमोर आले नाहीत,' असे म्हटले होते. यासंबंधीचे पत्र त्यांनी राज्यापाल वजूभाई वाला यांना सादर केले केले होते. आता न्यायालयाने बंडखोर आमदारांना अध्यक्षांसमोर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकचे बंडखोर आमदार मुंबईहून दुपारी निघणार

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या राजीनामा दिलेल्या आमदारांना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुंबईत असलेले आमदार दुपारी बंगळुरु येथे जाण्यासाठी निघण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

विधानसभा अध्यक्षांसमोर हजर व्हा, राजीनामा देणाऱ्या आमदारांना 'सर्वोच्च आदेश'

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सर्व बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या कार्यालयात संध्याकाळी ६ पर्यंत हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. तसेच, त्यांच्या अर्जावरील उद्याची सुनावणी स्थगित केली आहे.

अध्यक्ष रमेश कुमार राजीनामे संमत करण्यास विलंब करत आहेत, या कारणाने बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

-----------------------

Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.