ETV Bharat / bharat

आफ्रिकन चित्ता भारतात येणार? सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील - spotted big cat

सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकेतील नामिबीया येथून चित्ते भारतात आणण्यासाठी वन विभागाला हिरवा कंदील दाखवला आहे. भारताच्या वायव्य भागातील जंगलांमध्ये हे आफ्रिकन चित्ते प्रायोगिक तत्त्वावर आणण्यात येणार आहेत.

आफ्रिकन चित्ता भारतात
आफ्रिकन चित्ता भारतात
author img

By

Published : Feb 9, 2020, 3:59 PM IST

मुंबई - या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकेतील नामिबीया येथून चित्ते भारतात आणण्यासाठी वन विभागाला हिरवा कंदील दाखवला आहे. भारताच्या वायव्य भागातील जंगलांमध्ये हे आफ्रिकन चित्ते प्रायोगिक तत्त्वावर आणण्यात येणार आहेत. पूर्वी भारत आणि आशिया खंडात मार्जार प्रजातीच्या कुळातील (big cat species) वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबटे आणि चित्ते यांचे माहेरघर होते. मात्र, १९४८ नंतर चित्ता येथून नामशेष झाला. हौसेखातर होणाऱ्या वाढत्या शिकारी या प्रजातींच्या नष्ट होण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या.

भारतीय उपखंडात अधिवास असलेल्या आशिया खंडातील चित्त्याला मोठा इतिहास आहे. चित्ता हा हा शब्द संस्कृतमधील चित्रक (ठिपके असलेला) या शब्दापासून तयार झाला. मात्र, चित्ते नष्ट होण्याची कहाणीही तितकीच जुनी आहे. आशियातील चित्ते अगदी सहजपणे माणसाळणारे आहेत. यामुळे देशभरातील राजांनी हजारो चित्ते आपापल्या संग्रहालयात ठेवले होते. हे चित्ते काळवीटांच्या शिकारीसाठी वापरले जात असत. मात्र, या बंदीवासामुळे या चित्त्यांवर योग्य प्रकारे प्रजनन होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने रोडावली.

हेही वाचा - 'आय अ‌ॅम फॉर अल्लेप्पी' : केरळमधील पूरग्रस्तांना रामोजी समुहाने 121 घरे दिली बांधून

चित्त्यांची संख्येत मोठ्या वेगाने घट होण्यामागे याशिवाय आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र, या सर्व बाबींकडे झालेले 'दुर्लक्ष' हे सर्वांत मोठे कारण आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात चित्ते आणि त्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष होण्यास खरी सुरुवात झाली. याच काळात चित्त्यांचा अधिवास असलेल्या वनजमिनींवर माणसाचे विविध कारणांनी आक्रमण झाले. शेतजमिनी वाढवण्यासाठी बेसुमार जंगलतोड, जंगलांना आगी लावणे ही यातील प्रमुख कारणे ठरली. यामुळे वन्य प्राण्यांच्या डोक्यावरील छतच नाहीसे झाले.

याचे दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानंतर या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न होऊ लागला. वनजमीनींवर चरण्यास बंदी घातली, जंगलांना आगी लावण्यावर नियंत्रण ठेवण्यात आले, वनीकरण वाढवण्याला चालना दिली गेली.

हेही वाचा - कोरोनाचं संकट गडद; हवेतील द्रवकणांतूनही होतोय फैलाव

मात्र, यानंतर शेवटचा चित्ता १९५० मध्ये दिसल्यानंतरही या समस्येकडे दुर्लक्ष होणे सुरूच राहिले. भारत सरकारने शेतीला पाणी पुरवण्यासाठी सिंचनाला प्रोत्साहन दिले. हरित कार्यक्रमांमध्ये प्रॉसोपिस ज्युलिफ्लोरासारख्या परदेशी प्रजातीच्या वनस्पतींची लागवड केली, जी पूर्णपणे फसली. कागदाच्या लगद्याच्या उद्योगांसाठी निलगिरीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले. पूर्वी वन्य प्राण्यांचा खुला अधिवास असलेल्या जमिनींवर शहरे, बंदरे आणि कारखाने उभे करण्यासच प्राधान्य देण्यात आले.

Intro:Body:

आफ्रिकन चित्ता भारतात येणार? सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आफ्रिकेतील नामिबीया येथून चित्ते भारतात आणण्यासाठी वन विभागाला हिरवा कंदील दाखवला आहे. भारताच्या वायव्य भागातील जंगलांमध्ये हे आफ्रिकन चित्ते प्रायोगिक तत्त्वावर आणण्यात येणार आहेत. पूर्वी भारत आणि आशिया खंडात मार्जार प्रजातीच्या कुळातील (big cat species) वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबटे आणि चित्ते यांचे माहेरघर होते. मात्र, १९४८ नंतर चित्ता येथून नामशेष झाला. हौसेखातर होणाऱ्या वाढत्या शिकारी या प्रजातींच्या नष्ट होण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या.

भारतीय उपखंडात अधिवास असलेल्या आशिया खंडातील चित्त्याला मोठा इतिहास आहे. चित्ता हा हा शब्द संस्कृतमधील चित्रक (ठिपके असलेला) या शब्दापासून तयार झाला. मात्र, चित्ते नष्ट होण्याची कहाणीही तितकीच जुनी आहे. आशियातील चित्ते अगदी सहजपणे माणसाळणारे आहेत. यामुळे देशभरातील राजांनी हजारो चित्ते आपापल्या संग्रहालयात ठेवले होते. हे चित्ते काळवीटांच्या शिकारीसाठी वापरले जात असत. मात्र, या बंदीवासामुळे या चित्त्यांवर योग्य प्रकारे प्रजनन होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने रोडावली.

चित्त्यांची संख्येत मोठ्या वेगाने घट होण्यामागे याशिवाय आणखीही अनेक कारणे आहेत. मात्र, या सर्व बाबींकडे झालेले 'दुर्लक्ष' हे सर्वांत मोठे कारण आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात चित्ते आणि त्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष होण्यास खरी सुरुवात झाली. याच काळात चित्त्यांचा अधिवास असलेल्या वनजमिनींवर माणसाचे विविध कारणांनी आक्रमण झाले. शेतजमिनी वाढवण्यासाठी बेसुमार जंगलतोड, जंगलांना आगी लावणे ही यातील प्रमुख कारणे ठरली. यामुळे वन्य प्राण्यांच्या डोक्यावरील छतच नाहीसे झाले.

याचे दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानंतर या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न होऊ लागला. वनजमीनींवर चरण्यास बंदी घातली, जंगलांना आगी लावण्यावर नियंत्रण ठेवण्यात आले, वनीकरण वाढवण्याला चालना दिली गेली.

मात्र, यानंतर शेवटचा चित्ता १९५० मध्ये दिसल्यानंतरही या समस्येकडे दुर्लक्ष होणे सुरूच राहिले. भारत सरकारने शेतीला पाणी पुरवण्यासाठी सिंचनाला प्रोत्साहन दिले. हरित कार्यक्रमांमध्ये प्रॉसोपिस ज्युलिफ्लोरासारख्या परदेशी प्रजातीच्या वनस्पतींची लागवड केली, जी पूर्णपणे फसली. कागदाच्या लगद्याच्या उद्योगांसाठी निलगिरीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले. पूर्वी वन्य प्राण्यांचा खुला अधिवास असलेल्या जमिनींवर शहरे, बंदरे आणि कारखाने उभे करण्यासच प्राधान्य देण्यात आले.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.