ETV Bharat / bharat

अबब! गुगल सीईओ सुंदर पिचाई यांना १ हजार ७२० कोटींचं पॅकेज - सुंदर पिचाई बातमी

गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांच्यावर नव्यानेच 'अल्फाबेट' कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसाठी त्यांना घसघशीत पगार देण्यात आला आहे.

google ceo
सुंदर पिचाई
author img

By

Published : Dec 22, 2019, 8:04 PM IST

सॅन फ्रान्ससिस्को- गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांच्यावर नव्यानेच 'अल्फाबेट' कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसाठी त्यांना घसघशीत पगार देण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांना १ हजार ७२० कोटी रुपयांचे (२४२ मिलियन डॉलर) पॅकेज मिळाले आहे.

यात १ हजार ७०६ रुपयांचे शेअर मिळाले असून वार्षिक १४ कोटी रुपये वार्षिक वेतन समाविष्ट आहे. आत्तापर्यंतच्या सीईओंना दिल्या जाणाऱ्या पगारापेक्षा पिचाई यांना दिले जाणारे वेतन सर्वात जास्त आहे. २०२० पासून त्यांना हे लाभ मिळणार आहे. पिचाई यांच्या पगारामध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्यांना मिळालेली ही वाढ कार्यक्षतमतेवर आधारित आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली कंपनीने निर्धारीत लक्ष्य पूर्ण केल्यानंतर हे लाभ मिळणार आहेत.

हेही वाचा - हॅप्पी विंटर! गूगलने तयार केलं 'विंटर सोलस्टाइस'2019' हे खास डूडल

जर एस अॅड पूअर नामांकन संस्थेच्या क्रमवारीत अल्फाबेट कंपनीने चांगली कामगिरी केल्यानंतर पिचाई यांना ६३९ कोटी आणखी मिळणार आहेत. मागील महिन्यात पिचाई यांना अल्फाबेट कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुगल कंपनीचे सह संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन पायऊतार झाल्यानंतर पिचाई यांची नेमणूक अल्फाबेट कंपनीच्या सीईओपदी नेमणूक करण्यात आली.

२०१५ साली गुगलच्या सीईओ पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पिचाई यांनी ६ लाख ५२ हजार ५०० डॉलर पगार देण्यात येत होता. गुगल कंपनीने तयार केलेला क्रोम वेब ब्राऊझर यशस्वी करुन दाखवण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे.

सुंदर पिचाई १५ वर्षांपासून गूगल कंपनीमध्ये काम करत आहेत. मागील काही दिवसांपासून गुगलवर अमेरिकेची संसद लक्ष्य ठेवून आहेत. मुख्यत:हा नागरिकांची सुरक्षितता आणि बाजारातील कंपनीचे एकहाती वर्चस्व यावरून गुगलवर टीका करण्यात येते आहे.

हेही वाचा - 'अब दिल्ली दूर नही AQI २००'; मुंबईत मुलांचे आंदोलन लक्षवेधी

Intro:Body:

गुगल सीईओ सुंदर पिचाई यांना १ हजार ७२० कोटींचं पॅकेज

सॅन फ्रान्ससिस्को- गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांच्यावर नव्यानेच 'अल्फाबेट' कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसाठी त्यांना घसघशीत पगार देण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांना १ हजार ७२० कोटी रुपयांचे (२४२ मिलियन डॉलर) पॅकेज मिळाले आहे.

यात १ हजार ७०६ रुपयांचे शेअर मिळाले असून वार्षिक १४ कोटी रुपये वार्षिक वेतन समाविष्ट आहे. आत्तापर्यंतच्या सीईओंना दिल्या जाणाऱ्या पगारपेक्षा पिचाई यांना दिले जाणारे वेतन सर्वात जास्त आहे. २०२० पासून त्यांना हे लाभ मिळणार आहे. पिचाई यांच्या पगारामध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्यांना मिळालेली ही वाढ कार्यक्षतमतेवर आधारीत आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली कंपनीने निर्धारीत लक्ष्य पूर्ण केल्यानंतर हे लाभ मिळणार आहेत.

जर एस अॅड पूअर नामांकन संस्थेच्या क्रमवारीत अल्फाबेट कंपनीने चांगली कामगिरी केल्यानंतर पिचाई यांना ६३९ कोटी आणखी मिळणार आहेत. मागील महिन्यात पिचाई यांना अल्फाबेट कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुगल कंपनीचे सह संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन पायऊतार झाल्यानंतर पिचाई यांची नेमणूक अल्फाबेट कंपनीच्या सीईओपदी नेमणूक करण्यात आली.

२०१५ साली गुगलच्या सीईओ पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पिचाई यांनी ६ लाख ५२ हजार ५०० डॉलर पगार देण्यात येत होता. गुगल कंपनीने तयार केलेला क्रोम वेब ब्राऊझर यशस्वी करुन दाखवण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे.

सुंदर पिचाई १५ वर्षांपासून गूगल कंपनीमध्ये काम करत आहेत. मागील काही दिवसांपासून गुगलवर अमेरिकेची संसद लक्ष्य ठेवून आहेत. मुख्यत:हा नागरिकांची सुरक्षितता आणि बाजारातील कंपनीचे एकहाती वर्चस्व यावरून गुगलवर टीका करण्यात येते आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.