ETV Bharat / bharat

चांद्रयान - 2 जर यशस्वी झाले तर आपण जगासाठी मार्गदर्शक ठरू - खगोल अभ्यासक गवळी - खगोल अभ्यासक

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3 च्या मदतीने 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी मिशन चंद्रायान 2 हे अवकाशात झेपवणार आहे. उड्डानानंतर 52 दिवसानी चांद्रयान-2 चांद्रावर पोहोचणार आहे.

चांद्रयान-2
author img

By

Published : Jul 22, 2019, 2:27 PM IST

कोल्हापूर - भारताच्या चांद्रयान -1 मोहिमेनंतर तब्बल 10 वर्षांनी इस्रोची चांद्रयान -2 ही मोहीम होणार आहे. मिशन चांद्रयान-2 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहिमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. त्यामुळे या मोहिमेत आपण जर यशस्वी झालो तर आपण जगाला मार्गदर्शक ठरू, असे मत खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी कोल्हापुरात व्यक्त केले. या मोहिमेतील शेवटची 15 मिनिटे खूपच महत्वाची असणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3 च्या मदतीने 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी मिशन चांद्रयान 2 हे अवकाशात झेपवणार आहे. उड्डानानंतर 52 दिवसानी चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचणार आहे. या मोहिमेबाबत कोल्हापूर येथील खगोल अभ्यासक किरण गवळी म्हणाले. भारताच्या या महत्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जागाचे लक्ष लागून राहीले आहे. त्याला कारण म्हणजे भारताचे हे चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत त्या भागामध्ये उतरणार आहे. विशेष म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा नंबर लागणार आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश असणार आहे. त्यामुळे या मोहिकेकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. भारताच्या या कामगिरी नंतर आपण संपूर्ण जगाला मार्गदशक असणार आहोत. विशेष म्हणजे ज्या दिवशी लँडिंग असणार आहे, त्या दिवशी चंद्रावर उतरतानाची शेवटची 15 मिनिटे अत्यंत उत्कंठावर्धक असणार आहेत. कारण सॉफ्ट लँडिंग तसे सोपे असणार नाही. यापूर्वी सॉफ्ट लँडिंग करण्याची तीनच देशांनी कामगिरी केली आहे.

चांद्रयान 2 ची वैशिष्ट्ये -

चांद्रयान-2 एकूण 13 उपकरणे घेऊन जाणार आहे. त्यातील 12 उपकरणे भारतीय असणार आहेत तर नासाचे पॅसिव्ह एक्सपेरिमेंट हे 1 उपकरण असणार आहे. त्याचे वजन जवळपास आठ हत्तींच्या वजनाइतके म्हणजेच 3.8 टन इतके असणार आहे. चांद्रयान-2 चांद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आजपर्यंत चांद्राच्या या भागात पोहोचणारी कोणतीही मोहीम झालेली नाही. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भरात पहिलाच देश असणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.