चंदीगड- दिवाळीनिमित्त दर वर्षी लोक बाजारातून दिवे खरेदी करतात, पण दुसर्या दिवशी वापरलेले हे दिवे फेकून देतात. परंतु चंदीगडच्या काही मुलांनी हे टाकून दिलेले दिवे उपयोगात आणत नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे गरीबांच्या घरीदेखील दिवाळी साजरी होणार आहे. हे विद्यार्थी टाकून दिलेले दिवे विकून पैसे गोळा करणार आहे आणि या पैसे गरिबांना देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी मागील वर्षीच्या दिवाळी व छठ पूजेच्या निमित्ताने वापरण्यात आलेले हजारो दिवे गोळा करून नवे रूप दिले आहे.
हे विद्यार्थी टाकून दिलेले दिवे विकून त्याची विक्री करतील त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून 40 टक्के रक्कम गरीब कुटुंबांना देण्यात येणार असून 60 टक्के रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाईल. या पैशाने दिवाळीनिमित्त गरीब घरांना उजाळा मिळणार आहे. या मुलांनी सूरू केलेल्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतूक होत आहे.
विद्यार्थ्यांनी बायोडिग्रेडेबल पेन बनविला
एवढेच नाही तर या विद्यार्थ्यांनी बायोडिग्रेडेबल पेनही बनवले आहेत. या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे ते कागदापासून बनवले गेले आहे आणि त्यात बियाणे जोडले गेले आहेत. लोक हा पेन वापरल्यानंतर जमिनीत फेकतील, जेणेकरुन तेथे नवीन झाड उगवेल. या पेनमध्ये कोणतेही प्लास्टिक वापरलेले नाही. त्यामुळे पर्यावरणाची बचत होईल आणि गरीब विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.