ETV Bharat / bharat

दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही, शेतजमीन जाळल्याने होताहेत आरोप - दिल्ली प्रदूषण

अंबाला, फतेहाबाद, जींद, कैथल, करनाल आणि कुरुक्षेत्र येथे या घटना घडल्या आहेत. हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) पाहिली असता या शहरांमधील हवा दिल्लीतील शहरांच्या तुलनेत चांगली आहे. शिवाय एकूण प्रदूषणापैकी केवळ 8 ते 10 टक्के प्रदूषण कडबा जाळल्याने होत आहे. तर, उर्वरित 90 ते 92 टक्के प्रदूषण गाड्या आणि कारखान्यांवरील धुराड्यांमधून येणाऱ्या विषारी धुरामुळे होत आहे.

दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही
author img

By

Published : Nov 16, 2019, 3:59 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली आणि हरियाणासह उत्तर भारतात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने लोकांचा श्वास घुसमटू लागला आहे. या प्रदूषणासाठी हरियाणामध्ये शेतजमीन जाळण्यासाठी शेतात कडबा पेटवून देणाऱ्या शेतकऱ्यांना जबाबदार ठरवण्यात येत आहे. मात्र, यासाठी शेतकरी जबाबदार नाहीत. शेतकऱ्याला प्रदूषणाच्या नावाखाली विनाकारण बळीचा बकरा बनवण्यात येत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनीही असेच मत व्यक्त केले आहे.

दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही

हरियाणामध्ये शेतजमीन जाळण्याचे प्रकार

हरियाणात शेतजमीन जाळण्यासाठी कडबा पेटवून देण्याचा प्रकार सध्या कमी झाला आहे. मात्र, या 25 सप्टेंबरपासून 4 नोव्हेंबरपर्यंत हरियाणाच्या केवळ 6 जिल्ह्यांमध्ये कडबा जाळण्यात आला आहे. अंबाला, फतेहाबाद, जींद, कैथल, करनाल आणि कुरुक्षेत्र येथे या घटना घडल्या आहेत. हवेची गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) पाहिली असता या शहरांमधील हवा दिल्लीतील शहरांच्या तुलनेत चांगली आहे. शिवाय एकूण प्रदूषणापैकी केवळ 8 ते 10 टक्के प्रदूषण कडबा जाळल्याने होत आहे. तर, उर्वरित 90 ते 92 टक्के प्रदूषण गाड्या आणि कारखान्यांवरील धुराड्यांमधून येणाऱ्या विषारी धुरामुळे होत आहे.

शेतकऱ्यांवर फोडले जातेय खापर

शेतकऱ्यांनी शेतात कडबा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप सुरू आहे. मात्र, हे शेतकरी मागील अनेक वर्षांपासून कडबा जाळत आहेत. तरीही त्यांना दिल्लीतील प्रदूषणासाठी जबाबदार धरले जात आहे. शिवाय हे शेतकरी वर्षातील काही दिवसच शेतात कडबा जाळतात. सध्या प्रदूषण वाढल्याचा आरोप झाल्याने आणि वातावरण दूषित झाल्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे. त्यांच्याकडूनही प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

Intro:कैथलBody:ऑपरेशन परालीConclusion:स्पेशल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.