बेगुसराय - केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याने भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गंगाजलाने शुद्ध केला आहे. सीएए कायद्याच्या समर्थनार्थ शहरातील बलिया विभागात डॉ. आंबेडकर उद्यानामध्ये सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी गिरिराज सिंह यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता.
-
Bihar: CPI (Communist Party of India) & RJD (Rashtriya Janata Dal) workers washed the statue of BR Ambedkar (in pic 3), after Union Minister Giriraj Singh garlanded the statue in Begusarai. (14.02.2020) pic.twitter.com/opwCPqpaAN
— ANI (@ANI) February 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bihar: CPI (Communist Party of India) & RJD (Rashtriya Janata Dal) workers washed the statue of BR Ambedkar (in pic 3), after Union Minister Giriraj Singh garlanded the statue in Begusarai. (14.02.2020) pic.twitter.com/opwCPqpaAN
— ANI (@ANI) February 15, 2020Bihar: CPI (Communist Party of India) & RJD (Rashtriya Janata Dal) workers washed the statue of BR Ambedkar (in pic 3), after Union Minister Giriraj Singh garlanded the statue in Begusarai. (14.02.2020) pic.twitter.com/opwCPqpaAN
— ANI (@ANI) February 15, 2020
भाकप नेता सनोज सरोज आणि राजदचे नेते विकास पासवान यांनी गंगाजलाने आंबेडकरांचा पुतळा शुद्ध केला. यावेळी भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी जय भीम आणि म. ज्योतिबा फुले यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. दरम्यान पुतळा शुद्धिकरण करतानाचा व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आला आहे.
आपल्या भाषणामध्ये गिरिराज यांनी बलियाला छोटा पाकिस्तान संबोधून येथील वातावरण दुषीत केले आहे. गिरिराज हे मनुवादी आहेत. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याने तो अशुद्ध झाला. त्यामुळे पुतळ्याचे शुद्धीकरण केले, असे कार्यकर्ते म्हणाले.
दरम्यान या घटनेवर गिरिराज सिंह यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर सिंह यांनी नारजगी व्यक्त केली आहे. ही लोक सीएए विरोधाच्या नावावर देशामध्ये 1947 पूर्वीचे वातावरण तयार करण्याचा आहेत. आंबेडकर हे प्रत्येक वर्गासाठी आदर्श असून त्यांच्यावर कोणत्या एका पक्षाचा अधिकार नाही, असे सिंह म्हणाले.