ETV Bharat / bharat

सणासुदीच्या काळात राज्यांनी सार्वजनिक आरोग्य दृष्टीने अधीक सक्षम रणनीती आखावी - आरोग्य मंत्रालय - कोरोना बातम्या

येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात तसेच हिवाळा येत असल्याने प्रत्येक राज्याने सार्वजनिक आरोग्यच्या दृष्टीने अधीक सक्षम अशी रणनीती तयार करायला हवी. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रूग्णांची संख्या 10 लाखांच्या खाली आली असून रूग्ण बरे होण्याचा दर 84 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

states-should-adhere-to-public-health-strategy-health-ministry
येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात प्रत्येक राज्याने सार्वजनिक आरोग्य दृष्टीने अधीक सक्षम अशी रणणीती तयार करायला हवी- आरोग्य मंत्रालय
author img

By

Published : Oct 6, 2020, 11:07 PM IST

नवी दिल्ली- आगामी सणासुदीच्या दिवसांत सार्वजनिक आरोग्य दृष्टीने अधीक सजग राहायला हवे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटले आहे.

भारतात कोरोनातून जवळपास 56 लाख लोक बरे झाले असून चाचण्यांच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर देशात अद्यापर्यंत 8.१० कोटी चाचण्या करण्यात आला आहेत. येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात तसेच हिवाळा येत असल्याने प्रत्येक राज्याने सार्वजनिक आरोग्य दृष्टीने अधीक सक्षम अशी रणनीती तयार करायला हवी. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रूग्णांची संख्या 10 लाखांच्या खाली आली असून रूग्ण बरे होण्याचा दर 84 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

9 ते 15 सप्टेंबर दरम्यान भारतात 92,830 कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान 90,346 , 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान 83,232, तर 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत 77,113 कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोना रूग्णांच्या दैनंदिन दरात घट झाली असून हा दर 9.21 वरून 6.82 वर आला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल यासह दहा राज्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रूग्णांमध्ये वाढ झाल्याने राजेश भुषण यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या 8 राज्यांतील 25 जिल्ह्यांत एकूण 48 टक्के मृत्यूची नोंद झाली आहे, तसेच केंद्र सरकारने आरोग्य कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेले 95 विमांचे दावे मंजूर केले असून 176 दावे प्रलंबित असल्याची माहिती भूषण यांनी दिली. तसेच एका अभ्यासानुसार प्लामा थेरपी ही मृत्यूदर थांबविण्यात तसेच वाढणारा संसर्ग थांबविण्यात उपयोगी नाही, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मांडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.