वैशाली (राघोपूर) - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे प्रमुख नेते सभा घेत आहेत. पाटण्यातील मणेर येथे जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर राघोपूरला जात असताना तेजस्वी यादव यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. यावेळी आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य या मुद्दांना आमचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.
आम्ही राघोपूरची जागा जिंकणार आहोत. आमचे सरकार स्थापन होणार आहे. तसेच आम्ही 10 लाख नोकऱ्या देणार असून 5.50 लाख पदे आधीच रिक्त आहेत, पहिले ते भरण्याचे काम आम्ही करणार असल्याचे तेजस्वी यादव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. यानंतर ते आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसून राघोपूरला रवाना झाले.