सिलिगुडी - पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे रविवारी सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) जवानांनी कारवाई करताना नेपाळी नागरिकाला अटक केली आहे. साई प्रसाद राय (३३) असे अटक केलेल्या नेपाळी नागरिकाचे आहे. त्याच्याकडून ४० पॅकेट नेओगल, ९० स्फोटके आणि १०० इलेक्ट्रीकल डेटोनेटर्स जप्त करण्यात आली आहेत.
पॅरामिलिटरी बलाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की हा व्यकी शिलाँग (मेघालय) येथून आला होता. तो नेपाळमधील भोजपूरकडे निघाला होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली स्फोटके खोरीबारी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आली आहेत. याप्रकरणी सोमवारी सिलिगुडी न्यायालयात त्याला नेण्यात येणार आहे.