ETV Bharat / bharat

हैदराबादमध्ये अडकलेले हरियाणाचे १,२०० कामगार विशेष रेल्वेने घरी रवाना..

हैदराबादमध्ये अडकलेल्या हरियाणाच्या कामगारांना आपल्या राज्यामध्ये परत जाता यावे यासाठी लिंगमपल्लीवरून एक विशेष रेल्वे हरियाणाच्या हातियाकडे रवाना झाली आहे. तेलंगाणा सरकारने यावेळी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत या कामगारांना घराकडे रवाना केले.

special train was run earlier today from Lingampalli to Hatia on request of the Telangana Government
हैदराबादमध्ये अडकलेले हरियाणाचे १,२०० कामगार विशेष रेल्वेने घरी रवाना..
author img

By

Published : May 1, 2020, 12:42 PM IST

हैदराबाद - तेलंगाणामध्ये अडकलेल्या हरियाणाच्या तब्बल बाराशे कामगारांना आपल्या राज्यामध्ये परत जाता यावे यासाठी लिंगमपल्लीवरून एक विशेष रेल्वे हरियाणाच्या हातियाकडे रवाना झाली आहे. तेलंगाणा सरकारने यावेळी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत या कामगारांना घराकडे रवाना केले. गाडीमध्ये बसवण्यापूर्वी या सर्व कामगारांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात आले, तसेच रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

  • A one-off special train was run today from Lingampalli (Hyderabad) to Hatia (Jharkhand) on request of the Telangana Government & as per the directions of Union Railway Ministry. pic.twitter.com/9YptotxcbV

    — ANI (@ANI) May 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक विस्थापित कामगार परराज्यांमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता कित्येक राज्यांमधील कामगारांना आपापल्या राज्यांमध्ये परत पाठवण्यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन राज्यांच्या राज्य सरकारांनी विनंती केल्यानंतर मंत्रालय आणखीही अशा गाड्यांचे आयोजन करणार आहे.

दरम्यान, झारखंड सरकारही सुरुवातीपासून परराज्यात फसलेल्या झारखंडच्या मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे झारखंडमध्ये अडकून पडलेल्या इतर राज्यातील मजुरांनाही त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी करत आहे. या प्रयत्नांची सुरुवात झारखंडच्या साहिबगंज येथून पश्चिम बंगालसाठी गुरुवारी पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या बसने झाली.

हेही वाचा : राजस्थानात सहा महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.