ETV Bharat / bharat

...पण जगायचे कसे? हा घरी परतलेल्या प्रवासी मजुरांसमोर यक्षप्रश्न

author img

By

Published : Jun 9, 2020, 8:27 PM IST

संपूर्ण देशात आणि जगामध्ये पसरलेल्या कोरोना साथीच्या आजाराचा मोठ्या लोकसंख्येवर परिणाम झाला आहे. कामगार वर्गावरसुद्धा कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम झालाय. काही ठिकाणी काम बंद केल्यामुळे तर काही कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी मजुरांना इतर राज्यांमधून त्यांच्या राज्यात परत जाण्यास भाग पाडण्यात आलंय. परंतु आपल्या मायदेशी परत आल्यानंतरही मजुरांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कामगारांना त्यांच्याच राज्यात दोन वेळा भाकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. जेव्हा ईटीव्हीच्या बातमीदारांने कामगारांशी या विषयावर संवाद साधला तेव्हा ते काय म्हणत आहेत, हे सविस्तर वाचा.

special-story-migrants-
प्रवासी मजुरांसमोर यक्षप्रश्न

पाली (राजस्थान) - बरेच स्थलांतरित मजूर लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात अडकले होते, अशा परिस्थितीत प्रत्येकालासुरक्षेच्या दृष्टीने घरी परत जायचे होते. अनेक संकटांवर मात करत मजूर आता त्याच्या घरी पोहोचले आहेत. परंतु घरवापसीनंतर अनेक समस्यांनी ते त्रस्त झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. लॉकडाऊननंतर घरी परतण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना केलेल्या देशातील जवळपास प्रत्येक मजुरांची ही कहाणी आहे. दु:ख भोगल्यानंतर हे लोक त्यांच्या घरी पोचले आहेत, परंतु आता या स्थलांतरितांसमोर सर्वात मोठे संकट म्हणजे त्यांच्या क्षेत्रात रोजगार शोधणे आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे.

पालीमध्येही असे संकट सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. प्रशासनापुढे मायदेशी परतलेल्या परप्रांतीयांना नोकरी व इतर व्यवस्था पुरविणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ईटीव्ही भारतने अशा प्रवासी मजुरांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या बोलण्यातून वेदना ओठावर आल्या.

मजल दरमजल करीत घरी तर पोहोचले, ...पण जगायचे कसे?

सांगायचे म्हणजे, राज्यात पाली जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय आले आहेत. लॉकडाऊननंतर पालीतील सुमारे 1 लाख 88 हजार परप्रवासी मजुर आपल्या घरी परतले. हे सर्व प्रवासी राजस्थानच्या बाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश यासह अनेक राज्यांत नोकरीसाठी स्थायिक झाले होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे या सर्वांनी त्यांच्या या राज्यातील नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व स्थलांतरित अनेक त्रास सहन करून आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या घरी परतले. पालीकडे परत आलेल्या परप्रांतीयांकडे पैसे शिल्लक होते तोपर्यंत त्यांचा निभाव लागला. परंतु आता या कामगारासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे कुटुंब चालवणे. आता या स्थलांतरितांना इतर राज्यात परत जायचे नाही. अशा परिस्थितीत हे लोक लॉकडाऊन हटल्यानंतर रोजगाराच्या संदर्भात शेतात भटकत आहेत, पण त्यांना रोजगार मिळत नाही. या स्थलांतरितांनी सरकारसमोर रोजगार उपलब्ध करुन द्यावा आणि विविध योजनांना जोडले जावे अशी मागणी केली आहे.

प्रशासन दोन महिन्यांच्या रेशनची व्यवस्था करेल

जेव्हा ईटीव्ही भारतने जिल्हाधिकारी अंशदीप यांच्याशी स्थलांतरितांच्या समस्येबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, पालीतील सुमारे 1 लाख 88 हजार स्थलांतरित आपल्या घरी परतले आहेत. या सर्वांना भेडसावणाऱ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुढील स्थलांतरितांना पुढील 2 महिन्यांचे रेशन नि: शुल्क उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामध्ये स्थलांतरित कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो गहू, १ किलो हरभरा मोफत देण्यात येईल. प्रशासनाने यासंदर्भात सर्व स्थलांतरितांची यादी तयार केली आहे.

सर्व उद्योजकांशीही होणार चर्चा

जिल्हाधिकारी अंशदीप म्हणाले की, पाली येथे परत आलेल्या परप्रांतीय कामगारांना रोजगार मिळावा यासाठी पाली येथे कार्यरत सर्व सिमेंट कारखाने, वस्त्रोद्योग व अन्य औद्योगिक घटकांच्या संचालकांशी चर्चा केली जात आहे. सर्व कुशल कामगारांना हे रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आवाहन या सर्व उद्योजकांना केले जाईल. तसेच या कुटुंबांना बेरोजगार राहू नये म्हणून मनरेगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.