ETV Bharat / bharat

स्विमींगपुलमधील पाण्याखाली मिळाली सोन्याची बनावट बिस्कीटं; विशेष तपास पथकाची कारवाई

आयएमएचे संस्थापक मन्सूर खान याच्या निवासस्थानावर बुधवारी विशेष तपास पथकाने  छापा टाकला. यावेळी जलतरण तलावामधून 303 किलो  सोन्याची बनावट बिस्किटं पथकाने जप्त केली आहेत.

author img

By

Published : Aug 7, 2019, 10:21 PM IST

स्विमींगपुलमधील पाण्याखाली मिळाली सोन्याची बनावट बिस्कीटं

बंगळुरू- आयएमएचे संस्थापक मन्सूर खान याच्या निवासस्थानावर बुधवारी विशेष तपास पथकाने छापा टाकला. यावेळी जलतरण तलावामधून 303 किलो सोन्याची बनावट बिस्किटं पथकाने जप्त केली आहेत. तर पथकाने वसीम नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

  • Bengaluru: Special Investigation Team seized 303 kg of fake gold biscuits from under a swimming pool at IMA founder Mansoor Khan's residence. A person named Vasim was taken into custody. #Karnataka pic.twitter.com/LuqA3u42bg

    — ANI (@ANI) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आय मॉनेटरी अॅडव्हायझरी (आयएमए) या नावाने इस्लामिक बँक चालवणारा मन्सूर खान कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेला होता. मन्सूरने इस्लामिक बँकेच्या नावाखाली मुस्लीम समाजातील लोकांकडून सुमारे १ हजार ५०० कोटी रुपये गोळा केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, मन्सूरविरोधात पहिला गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याने देशाबाहेर पोबारा केला होता.

त्यानंतर त्यांने आपण भारतात परत येत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. मला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी भारतात पुढील २४ तासात परतणार आहे. आयएमए घोटाळा प्रकरणात भारत सोडणे ही माझी मोठी चूक होती. परंतु मला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्याची गरज होती, त्यामुळे मी भारत सोडून दुबईला गेलो. माझे कुटुंब कुठे आहे हे मला माहित नाही, असे त्यांने व्हिडिओमध्ये म्हटले होते. सध्या तो ईडीच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.

Intro:Body:

1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.