ETV Bharat / bharat

गुरुपौर्णिमा विशेष : राज्यातील सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आपल्या गुरुंच्या आठवणींना उजाळा - पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद

5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.

gurupournima occasion
गुरुपौर्णिमा विशेष
author img

By

Published : Jul 5, 2020, 9:26 AM IST

Updated : Jul 5, 2020, 1:17 PM IST

हैदराबाद - 'गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष। गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष'।। गुरुच्या परिस स्पर्षाशिवाय मनुष्यातील अज्ञान रुपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य-असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य, काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. गुरुंचा हाच महिमा सांगत आहेत, भारतीय प्रशासन सेवा आणि पोलीस सेवेतील अधिकारी. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने राज्यातील सनदी अधिकारी, पोलिस अधिकारी यांना आपल्या गुरुंबद्दल बोलते केले आहे. कोणाला आई-वडिलांच्या कष्टातून-शिकवणीतून गुरु भेटले तर कोणाला शिक्षकांच्या एका प्रोत्सहनपर शब्दाने आयुष्याची दिशा मिळाली. महाराष्ट्राची माती आणि माणसं यांनाच काही एकलव्यांनी गुरु मानले तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारी आणि नवं काहीतरी शिकवणारी प्रत्येक व्यक्ती मग ते आई-वडील, शिक्षक, पत्नी, मुलं, मित्र कोणीही असेल, पण त्यांच्याकडून चांगलं तेवढं घेण्याची वृत्ती जागृत ठेवून असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गुरुंबद्दलच्या भावना आणि त्यांच्या गुरुंची शिकवण ही महाराष्ट्रालाही तेवढीच महत्त्वाची ठरणारी आहे. काय म्हणालेत हे अधिकारी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा.

  • महेश भागवत - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे स्थान आणि महत्व अनन्यसाधारण असे असते. आज (रविवार) गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने तेलंगाणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेले मराठमोळे अधिकारी महेश भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'जवळ त्यांच्या गुरूंबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वाचा सविस्तर - गुरुपोर्णिमा विशेष : शाहा सरांच्या 'त्या' पत्रामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी - महेश भागवत

  • सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते - कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करुन कसे पुढे जायचे याचे भान देणारे माझे आई-वडील, प्रोफेशनच्या स्तरावर माझे वरिष्ठ, मुलीसारखे प्रेम करणारे शिक्षक आणि काही मित्र-मैत्रिणी हे माझे गुरू राहिले.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करण्याचे भान देणारे गुरू' - तेजस्वी सातपुते

  • जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले - आई-वडिलांप्रमाणे शिक्षकांचा देखील आपल्या आयुष्यात गुरू म्हणून मोठा वाटा असतो. या गुरूंनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी दाखवलेली वाट, शिकवण यामुळेच आपण आयुष्यात यशस्वी होत असतो. माझ्या आयुष्यात आई-वडिलांप्रमाणे माझे शिक्षक गुरुस्थानी आहेत.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'आई-वडिलांप्रमाणे शिक्षक माझ्या गुरुस्थानी ' - डॉ. पंजाबराव उगले

  • कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई - शाळेत असो किंवा कॉलेज ज्या ज्या ठिकाणी मी शिकलो त्या त्या ठिकाणी मी तेथील गुरुंचा आवडता शिष्य होतो. गुरुंचा आवडता असल्याने जबाबदारी सुद्धा वाढते आणि यातच माझ्या यशाचे गमक असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'शाळा-कॉलेजमध्ये मी गुरुंचा असायचो आवडता शिष्य' - जिल्हाधिकारी दौलत देसाई

  • बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूच्या संदर्भाने दोन टप्पे पडतात. पहिला टप्पा हा प्रत्येक व्यक्तीचे आई-वडील त्या व्यक्तीवर संस्कार करत असतात. आपल्या आयुष्यातील वाटचाल आई-वडील यांच्या संस्कारातूनच ठरतात. त्यामुळे माझे पहिले गुरू माझ्या आई वडील आहेत.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'माता अनं मातीच माझी गुरू' - पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

  • गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे - सर्वात जवळचे माझे गुरू मुकुल पाठक सर आहे. त्यांनी मला यूपीएससीला शिकवले. मी तयारी करत असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तू करू शकतेस, असे ते मला नेहमी सांगत. त्यामुळेच आज मी जिल्हाधिकारी बनू शकले, असे गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : ...म्हणून मी जिल्हाधिकारी होऊ शकले - डॉ. कादंबरी बलकवडे

  • जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व असते. माझ्या आयुष्यात आतापर्यंतच्या वाटचालीत गुरू म्हणून आई-वडिलांचीच प्रमुख भूमिका राहिली आहे. हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. गुरू म्हणून त्यांनीच मला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'आई-वडील हेच माझ्या आयुष्यात गुरुस्थानी' - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

  • धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित - माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींकडून मी काहीतरी शिकत असतो. माझे आई-वडील हे माझे पहिले गुरू आहेत. तसेच माझे काका कर्नल पंडित यांनी मला सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र, काही वैद्यकीय कारणांमुळे मी सैन्यात जाऊ शकलो नाही.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती गुरूच' - चिन्मय पंडित

  • हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी - जीवन जगत असताना प्रत्येकाला गुरू भेटतच असतो, कारण गुरूशिवाय जीवन जगणे हे खरोखरच निरर्थक आहे. गुरूने दिलेली शिकवण आपण जर नेहमीच आचरणात आणत गेलो तर खरोखरच आपण आपले तर भले करू शकतो शिवाय दुसऱ्याचे ही आपल्यापासून भले होते.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'वडील हेच माझे गुरू' - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

  • नांदेड पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर - माझ्या आयुष्यात खरे सांगायचे तर मला प्राथमिक शाळेतच चांगले गुरू लाभले. त्यांच्यामुळेच मला शिक्षणाची खरी गोडी लागली. प्राथमिक शिक्षकाच्या शिकवणुकीची शिदोरी मला आयुष्यभर पुरत आहे

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'प्राथमिक शिक्षणातील गुरुंच्या प्रेरणेमुळेच आयुष्यातील प्रवास यशस्वी' - विजयकुमार मगर

  • वर्धा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली - भाऊ आणि वडील यांच्यामुळेच या पदावर पोहोचलो. पण, या प्रवासात वडिलांनी जगणं शिकवले, तर भावाने यशाचा मार्ग दाखवला. आईची इच्छा म्हणून डॉक्टर झालो. या सगळ्या प्रवासाचे श्रेय शाळेतील गुरूंना आहेच. पण, वडील आणि भाऊ यांचे स्थान गुरू म्हणून श्रेष्ठ असल्याची भावना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बोलून दाखवली.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : वडिलांना पाहून जगणं शिकलो, भावाने यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग दाखवला

  • नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे - एकदा माझ्या वर्गातील मुलांनी गोंधळ केला. यात माझे नाव पुढे आल्याने मी सलग १५ दिवस शाळेतच गेलो नाही. तेव्हा वडिलांपर्यंत माझी तक्रार गेली. त्यावेळी वडिलांनी माझी चूक कुठे झाली? याची जाणीव करून दिली.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : 'वडिलांच्या 'त्या' एका शिकवणीमुळे माझे आयुष्य घडले'

  • नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय - अगदी लहान वयात गुरूंकडून लाभेलेल्या मार्गदर्शनामुळेच आज जीवनाला पूर्णत्वाचा आकार प्राप्त झाला आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि गुरूंजनांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच आज तब्बल ३० वर्ष पोलीस खात्यात नोकरी केल्याचे समाधान मिळत आहे.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : 'गुरू करो जानके और पानी पियो छानके'

  • नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे - मी एका खेड्यातून समोर आलो आहे. मी जिल्हा परिषद शाळेतून शिकलो आहे. तेथील शिक्षकांनी मला घडवले. माझे आई-वडील माझे गुरू आहेत. त्यांनी मला घडवले. गुरू खूप पांडित्यपूर्ण असला पाहिजे असा नाही. त्याने संस्कार केले पाहिजे.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : गुरूपौर्णिमेच्या दिवशी जाणून घ्या कोण आहेत विश्वास नांगरे पाटलांचे गुरू

  • गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे - 'माझ्या जीवनातील पहिले गुरू आई-वडील आहेत. त्यांची शिकवण तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणादरम्यान मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आज मी आयपीएस अधिकारी घडलो.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नम: : 'आई-वडील व शिक्षकांमुळे आयपीएस झालो'

  • रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी - प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक पावलावर आपल्याला गुरुंची शिकवण मिळत असते. माझे पहिले गुरू हे आई वडील असून त्यांनी मला जीवनात संघर्ष करण्याची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा दिली. जिल्हाधिकारी होणार हे शालेय जीवनात शिक्षकांनी ओळखले होते.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नम: : 'तहसीलदार म्हणजे काय हे माहिती नव्हते तेव्हा माझे गुरू 'कलेक्टर सायबा' म्हणायचे'

  • बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूचे एक वेगळे स्थान असते. जीवनात प्रगती साधायची असेल तर गुरुच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. माझ्या आयुष्यातदेखील गुरु म्हणून माझ्यावर संस्कार करणारे माझे आई-वडील त्यांच्यानंतर समाज यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'ज्या समाजासाठी मी काम करतो तो समाजच माझा गुरु' - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

  • अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर - चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपले आयुष्य घडत असते. त्यांनी दाखविलेले मार्ग हे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून एका यशोशिखरावर पोहोचवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरतात.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंच्या चांगल्या मार्गदर्शनामुळेच लाभले यश - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

  • औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील - माझ्या गुरुंमुळेच मी अधिकारी झाले अशा भावना जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केल्या.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : 'माझ्या गुरुंमुळे आज मी अधिकारी झाले'

  • ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर - लहानपणापासून आतापर्यंत आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मला गुरू भेटत गेले. शालेय, महाविद्यालयीन आणि नोकरी व्यवसायात आतापर्यंत जे गुरू लाभले त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांची माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका आहे.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : 'शालेय, महाविद्यालयीन अन् नोकरी व्यवसायातील गुरूंचे अनन्यसाधारण महत्व'

  • वाशिम पोलीस अधीक्षक वसंत परदेशी - प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे योगदान नेहमीच अग्रस्थानी असते. तसेच माझ्या शालेय शिक्षकांचे माझ्या आयुष्यात फार महत्व आहे. मला घडवण्यात तीन ते चार शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः 'गुरुंना भेटल्यानंतर आजही काम करण्याची स्फूर्ती मिळते'

  • लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत - आयुष्यात गुरुजनांची भूमिका महत्वाची असते. योग्य वेळी मार्गदर्शन आणि होत असलेल्या चुका वेळीच निदर्शनास आणून दिल्याने जीवनात बदल होतो.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : 'शिक्षकांमुळे दहावीत गणित सुधारले अन् आयुष्याची गोळाबेरीज जमली'

  • लातूर अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव - जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर गुरुची भूमिका महत्वाची आहे. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन आणि त्यानुसार झालेली वाटचाल यामुळेच आज हे शक्य झाले आहे. ही सर्व भूमिका आई-वडील आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांमुळे निभावली आहे.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरुवे नमः : 'आई-वडिलांच्या शिकवणीमुळे अंगिकारले नवनवे पैलू'

  • जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे - गुरुंसोबत बोलल्यानंतर मला पुन्हा काम करण्याची स्फूर्ती मिळते, अशा शब्दात प्रशासकीय अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ईटीव्ही भारतसोबत बोलताना त्यांनी आपल्या गुरुचे महत्त्व सांगितले.

वाचा सविस्तर - 'गुरुंसोबत बोलल्यानंतर मला पुन्हा काम करण्याची स्फूर्ती मिळते'

  • पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर - माझे पहिले गुरू आई-वडील आहे. ते दोघेही शिक्षकी पेशातील आहे. माझी जडणघडणीमध्ये सर्वात मोठा त्यांचा वाटा आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळे गुरू भेटत गेले. त्यांनी प्रत्येक संकटांना कसे सामोरे जायचे? हे मला माझ्या गुरुंनी सांगितले.

वाचा सविस्तर - तस्मै श्री गुरवे नमः : 'संकटकाळात लढण्याचे बळ गुरूंमुळेच मिळाले'

  • बुलडाणा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ - भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हेच गुरुदक्षिणा म्हणून देणार, या शब्दात पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : 'भ्रष्टाचारमुक्त प्रशासन' गुरुदक्षिणा म्हणून देणार - दिलीप भुजबळ

  • जालना पोलीस उपविभागीय अधिकारी - सुख-दुःखामध्ये गुरुंची आठवण काढा म्हणजे शक्ती आणि शांती मिळेल. एवढेच नव्हे तर जिथे जिथे सकारात्मक ऊर्जा मिळेल तिथे तिथे हे गुरुच आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत असे समजा, अशी भावना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी व्यक्त केल्या.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : गुरुमुळे शक्ति आणि शांती मिळते - सुधीर खिरडकर

  • चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार - एखाद्या प्रसंगाने आयुष्याला कलाटणी मिळते, असे म्हणणे धाडसाचे आहे. कारण प्रत्येक दिवस, मित्र, पुस्तके आपल्याला प्रत्येक दिवशी शिकवत असतात, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : एखादा प्रसंग नव्हे तर प्रत्येक अनुभवातून आयुष्याला कलाटणी - डॉ. कुणाल खेमणार

  • गोंदिया पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे - आई वडिलांसह प्रत्येक स्तरावर मला 'बेस्ट' व्यक्ती भेटल्या, त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा शब्दात गोंदियाचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी व्यक्त केल्या.

वाचा सविस्तर - गुरुपौर्णिमा विशेष : आई-वडिलांसह प्रत्येक स्तरावर 'बेस्ट' व्यक्ती भेटल्या; त्या सर्वांचे आभार - मंगेश शिंदे

Last Updated : Jul 5, 2020, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.