ETV Bharat / bharat

'एसपीं'च्या निधनाने संगीतातील एका सुवर्ण युगाचा अंत

प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांनी आज वयाच्या ७४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कारकिर्दीत 16 भाषांमधील 40 हजारपेक्षाही जास्त गाणी गावून त्यांनी अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या संगीत प्रवासावर ईटीव्ही भारतने टाकलेली एक नजर...

sp balasubramanyam
एसपी बालासुब्रमण्यम
author img

By

Published : Sep 25, 2020, 2:10 PM IST

हैदराबाद - अनेक वर्ष आपल्या आवाजाने दक्षिणात्य सिनेमात जादू चालवल्यानंतर पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांनी हिंदी चित्रपटांमध्येही निर्विवाद यश संपादन केले. या महान गायकाने आपल्या प्रतिभेच्याबळावर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

पद्मभूषण पुरस्कार विजेत्या एसपींनी 1966 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'श्री श्री मर्यादा रमन्ना' या तेलुगू चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम आपला आवाज दिला होता. त्यानंतर त्यांनी कन्नड आणि तमिळ गाणीही गायली.

अल्पावधीतच संगीताच्या दुनियेत एसपी प्रसिद्ध झाले. मात्र, त्यांनाही अनेक चढउतार पहावे लागले. सुरुवातीला शास्त्रीय संगीतात ज्ञान कमी असल्याचे कारण देत त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. मात्र, एसपींनी कोणत्याही टीकेला न जुमानता कष्ट केले. त्यांनी प्रसिद्ध तेलुगू चित्रपट 'शंकराभरणम' मध्ये आपला आवाज दिला. या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली. बालासुब्रमण्यम यांनी पटकावलेल्या सहा राष्ट्रीय पुरस्कारांमधील पहिला पुरस्कार हा तेलुगू गाण्यासाठीच मिळालेला आहे.

बालासुब्रमण्यम यांनी लोकप्रिय नंदमुरी तारक रामा राव यांच्यासह अनेक दिग्गज दक्षिणात्य अभिनेत्यांची गाणी गायली. कमल हसनच्या 'एक दूजे के लिए' चित्रपटातील गाण्यांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांना तमीळ आणि कन्नड गाण्यांसाठी देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

1989 मध्ये सलमान खान अभिनीत 'मैंने प्यार किया' या चित्रपटात एसपींनी गाणी गायली. या गाण्यांनी संपूर्ण देशभरात त्यांना लोकप्रियता मिळाली. अनेक हिंदी संगीतकारांना त्यांची प्रशंसा केली. त्यांच्या जादुई आवाजाने 'मैंने प्यार किया' या चित्रपटाला ब्लॉकबस्टर होण्यास भूमिका निभावली. यासाठी त्यांना 1990 ला फिल्मफेयर अवार्डही मिळाला.

बालाचंदर यांची 1980मधील कमल हसन अभिनित 'एक दूजे के लिए' चित्रपटातील 'तेरे मेरे बीच' या गाण्याने सर्व रेकॉर्ड तोडले. या गाण्यासाठी त्यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर तेलुगू गाण्यांसाठी आणखी दोन आणि तमिळ व कन्नड गाण्यांसाठी प्रत्येकी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

1999 मध्ये तेलंगणातील पोटी श्रीरामुलु विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले होते. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी केंद्र सरकारने एसपी बालासुब्रमण्यम यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. 2016 मध्ये त्यांना रजत मयूर पदकाने सन्मानित करण्यात आले.

आज एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतील एका सुवर्ण युगाचा अंत झाला. मात्र, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनात ते कायम चिरतरूण राहतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.