ETV Bharat / bharat

कोणीही मदत केली नाही; मुंबईहुन स्कुटीवर सोनिया निघाली जमशेदपुरला - स्कूटी चलाकर सोनिया मुंबई से पहुंची जमशेदपुर

मुंबईत एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारी सोनिया दासचा पूर्ण परिवार कदमामधील भाटिया वस्ती परिसरात राहतो. त्यांचे पती अभिषेक घोष यांना हृदयाचा आजार आहे. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगाही आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर मात्र, त्या मुंबईत अडकल्या. त्यांच्या जवळ काही रोजगाराचे साधनही नसल्याने घराची आर्थिक परिस्थिती बिघडली होती.

sonia das
सोनिया दास
author img

By

Published : Jul 25, 2020, 11:52 AM IST

जमशेदपुर (झारखंड) - लॉकडाऊन काळापासून विविध राज्यातील लोक आपापल्या गावी परतले. मात्र, राज्यातील अनेक लोक अजूनही दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले आहेत. त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नानंतरही ते आपापल्या गावी परत येऊ शकले नाहीत. जमशेदपुरातील कदमा येथील सोनिया दासदेखील मागील चार महिन्यांपासून मुंबईत अडकली होती. यानंतर ती कोणाच्याही मदतीविना टाटासाठी निघाली.

स्वत: जाण्याचा घेतला निर्णय -

जमशेदपुर येथील रहिवासी सोनिया दास शुक्रवारी संध्याकाळी रस्त्याच्या मार्गाने मुंबईहून जमशेदपूर येथे पोहोचली.

मुंबईत एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारी सोनिया दासचा पूर्ण परिवार कदमामधील भाटिया वस्ती परिसरात राहतो. त्यांचे पती अभिषेक घोष यांना हृदयाचा आजार आहे. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगाही आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर मात्र, त्या मुंबईत अडकल्या. त्यांच्या जवळ काही रोजगाराचे साधनही नसल्याने घराची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. घरभाडे न दिल्यामुळे घरमालकानेही त्यांना घरातून बाहेर काढले होते. यानंतर त्या पुण्यात राहणारी एक मैत्रिण साबिया हिच्याजवळ राहू लागल्या, सोनिया ने घरी जाण्यासाठी अभिनेता सोनू सूद पासन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तिने ट्विट करत मदतीचा हातही मागितला होता. मात्र, तिला कोणीच मदत केली नाही. यानंतर तीने आपली मैत्रिण साबिया सोबत आपल्या स्कुटीवर स्वत:च जमशेदपुरला आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

Sonia reached jamshedpur from Mumbai by Scooty
सोनिया हिने अभिनेता सोनू सूद आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले ट्विट.

यासाठी त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांकडून 5 हजार रुपये रक्कम मागून गोळा केली. याठिकाणी त्यांनी 21 जुलैला त्यांनी जवळपास 1 हजार 800 किमी हा प्रवास सुरू केला. यानंतर त्या बुधवारी 22 जुलैला सायकांळी रायपुर येथे पोहोचल्या. मात्र, याठिकाणी त्यांनी प्रशासनाने काही कारणास्तव थांबवून घेतले. यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांना तेथून सोडण्यात आले. यानंतर पुन्हा त्यांनी आपला प्रवास सुरू केला.

त्या म्हणाल्या - अनेक प्रयत्नांनंतरही मदत मिळाली नाही. म्हणून मग त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत एकट्याच जाण्याचा निर्णय घेतला. जमशेदपूर येथे येण्यासाठी त्यांना वाहन पासची लागेल, अशी माहिती काही लोकांनी दिली होती, असेही त्यांनी सांगितले. त्या पाससाठी स्थानिक उपायुक्त यांच्या आदेशपत्र लागेल. यानंतर त्यांनी आपल्या पतीला उपायुक्त यांच्याकडे पाठवले होते. मात्र, त्यांना त्यांना परत पाठवले. इतक्या सर्व प्रयत्नांनंतर कोणतीही मदत न मिळाल्यामुळे त्यांनी स्वत: जमशेदपुरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. पतीची तब्येत खराब असल्यामुळे ते त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष नाही देऊ शकत, असे सोनिया यांनी सांगितले.

दरम्यान, जमशेदपुर येथे पोहोचल्यानंतर सोनिया यांनी स्वत: जबाबदारीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. यांनंतर त्या क्वारंटाईन सेंटर येथे पोहोचल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.