ETV Bharat / bharat

लॉकडाऊन: किराणा आणायला घराबाहेर पडला अन् लग्न करून माघारी आला - Marriage during lockdown

लॉकडाऊन काळात तरूण भाजी आणि किराणा आणायला गेला होता. मात्र, त्याने येताना आपल्या प्रियसीसोबत लग्न केले.

ghaziabad shadi
लॉकडाऊनमध्ये लग्न
author img

By

Published : Apr 29, 2020, 11:50 AM IST

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक मुलामुलींची लग्न खोळंबून पडली आहेत. मात्र, असे असतानाही काहीजण व्हिडिओ कॉन्फरंन्सिग द्वारे किंवा सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न करत आहेत. मात्र, दिल्लीतील गाझीयाबाद येथून लग्नाची एक वेगळीच कहानी समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातून किराणा आणण्यासाठी बाहेर पडलेला तरूण लग्न करून नववधूसह घरी परतला.

प्रेयसीसोबत केले लग्न

लॉकडाऊन काळात तरूण भाजी आणि किराणा आणायला गेला होता. मात्र, त्याने येताना आपल्या प्रियसीसोबत लग्न केले, आणि नववधूसह घरी परतला. मुलाने लग्न केलेले पाहून आईला धक्काच बसला. मुलाीच्या आईने दोघांना घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रकरण पोलिसांत पोहचले.

किराणा आणायला घराबाहेर पडला अन् लग्न करून माघारी आला

मुलाची आईही पोलीस ठाण्यात पोहचली. माझ्या मुलाने लॉकडाऊनचा नियम मोडला आहे. तो किराणा आणायला गेला होता. पण लग्न करून आला. मी या मुलीला ओळखत नसून दोघांना का घरात घेऊ? असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित केला.

मंदिरात लग्न केल्याचा तरुणाचा दावा

या तरुणाने खरेच लग्न केला का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र, मंदिरात जाऊन लग्न केल्याचा दावा त्याने केला आहे. पोलिसांनी मुलाची आई आणि तरुण तरूणीला समजाऊन सांगितले. आता नवदांम्पत्य भाड्याच्या घरात राहण्यास गेले आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत घरी येऊ नका, असे मुलाच्या आईने दोघांना बजावले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.