सोमनाथ (गुजरात ) - प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ महादेव मंदिराचे दरवाजे येत्या आठ जूनपासून भाविकांसाठी उघडणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार मंदिरात पूजा विधी पार पडतील. सोमनाथ मंदिरात एका तासात फक्त ३०० व्यक्तीच दर्शन घेऊ शकतील.
गीर सोमनाथ जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना 12 जूननंतर सोमनाथ ट्रस्टच्या वेबसाईटवर आधीच रजिस्ट्रेशन करावे लागेल. ट्रस्टकडून भाविकांना वेळ ठरवून देण्यात येईल. त्याच वेळेत त्यांना दर्शनासाठी जाता येईल. सोबतच सोमनाथ मंदिरात 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना आणि दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांना प्रवेश देण्यात येणार नाही.
लॉकडाऊनच्या आधीच 19 मार्च पासून सोमनाथ मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नियमानुसार सोमनाथ मंदिर येत्या आठ जूनला भाविकांसाठी भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. भाविकांमध्ये कोरोनाचे संक्रमण पसरू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे.
सोमनाथ मंदिराबाहेर भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप बांधण्यात आले आहेत. तसेच दोन ठिकाणी सॅनिटायझर चेंबर लावण्यात आले आहे. या सॅनिटायझर चेंबरच्या माध्यमातून भाविकांवर सॅनिटायझर शिंपडण्यात येईल. तसेच सोशल डिस्टंसिंगसाठी मंदिर परिसरातील रस्त्यांवर सर्कल करण्यात आले आहेत. दोन भाविकांच्या दरम्यान चार ते पाच फुटांचे अंतर असेल. मंदिरात मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व नियमांचे पालन करून एका तासात 300 भाविकांना सोमनाथ मंदिरात दर्शन घेता येईल.
गीर सोमनाथ जिल्ह्यात इतर राज्य किंवा जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना सोमनाथ ट्रस्टच्या वेबसाईटवर वेबसाईटवर 12 जून पासून दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागेल. त्यानंतर मंदिराकडून देण्यात आलेल्या वेळेतच त्या भाविकांना दर्शन घेता येईल.
सरकारच्या गाईडलाईन्स नुसार घेतलेल्या निर्णयानुसार सोमनाथ मंदिरात 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांना आणि दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. या वयातील लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता सर्वात जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांना कुठल्याही, रेलिंगला, मूर्तीला तसेच मंदिरातील घंटीला हात लावू नये, असे नियम घालण्यात आले आहेत.
तसेच नवीन नियमानुसार सोमनाथ मंदिरात लोकांना दंडवत प्रणाम घालता येणार नाही. सोबत मंदिरात गंगाजल बेलपत्र आणि फूल आणण्याची परवानगी नसेल, असे सोमनाथ ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.