ETV Bharat / bharat

सीएए समर्थनार्थ रामदेव बाबा मैदानात, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर निशाणा - रामदेव बाबा

योगगुरू रामदेव बाबा यांनी सीएए कायद्याचे समर्थन केले असून जेएनयू आणि जामियामधील सीएएविरोधी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर टीका केली आहे.

रामदेव बाबा
रामदेव बाबा
author img

By

Published : Jan 24, 2020, 5:14 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. आता योगगुरू रामदेव बाबा यांनी सीएए कायद्याचे समर्थन केले असून जेएनयू आणि जामियामधील सीएएविरोधी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर त्यांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांनी मोहम्मद अली जीनाप्रमाणे आझादीच्या घोषणा देणे, हे देशविरोधी असल्याचे रामदेव बाबा म्हणाले.

  • Yog Guru Ramdev, in Delhi: No one can be stripped off their citizenship. Misinformation is being spread that citizenship of Muslims will be revoked through #CitizenshipAmendmentAct. It's wrong. There are some domestic & international forces that want to create division in society pic.twitter.com/DYDozMUekj

    — ANI (@ANI) 24 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'गांधी,नेहरू आणि भगतसिंग यांच्यासारख्या आजादीच्या घोषणा आपण समजून घेऊ शकतो. मात्र, मोहम्मद अली जीनाप्रमाणे आजादीच्या घोषणा देणे हे देशविरोधी आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.

'विद्यार्थ्यांनी सर्वकाळ आंदोलन करू नये. त्यामुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. देशामध्ये गरिबी, महागाई, बेरोजगारी या मोठ्या समस्या आहेत. त्याविरोधात आपण सर्वांनी उभे राहायला हवे. देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे', असे रामदेव बाबा म्हणाले.

हेही वाचा - 'त्या' टि्वटमुळे कपिल मिश्रा यांना निवडणूक आयोगाने पाठवले नोटीस

सीएए कायद्यातील सुधारणांचा देशातील नागरिकांशी काही संबंध नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्याही धर्माविरुद्ध नसून, या कायद्याने कोणाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. या कायद्याबाबत खोट्या अफवा पसरल्या असून मुस्लिमांची दिशाभूल केली आहे, असेही रामदेव बाबा म्हणाले.

हेही वाचा - सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीय नर्सला कोरोना व्हायरसची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.