ETV Bharat / bharat

फुफ्फुसातील रक्ताच्या गाठींवर उपाय काय?

author img

By

Published : Nov 8, 2019, 6:33 PM IST

फुफ्फुसात रक्ताच्या गाठी का होतात? यावर उपाय काय आहे?असा आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? याबद्दल लिहित आहेत, वरिष्ठ फुफ्फुसरोग तज्ञ डॉ. आर. विजय कुमार.

Solution for Blood clot in lungs

फुफ्फुसात रक्ताच्या गाठी असणाऱ्या एका रुग्णाच्या मुलाने प्रश्न मांडला आहे..

प्रश्न : माझ्या वडिलांचे वय ५७ वर्षे आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. तपासण्या झाल्यानंतर, डॉक्टरानी सांगितले की, त्यांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. ही समस्या काय आहे? फुफ्फुसात रक्ताच्या गाठी का होतात? यावर उपाय काय आहे?असा आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? कृपया स्पष्ट करावे.

उपाय: हा आजार म्हणजे तुमच्या वडिलांना पल्मोनरी 'थ्रोम्बोइम्बोलीझम' म्हणजे फुफ्फुसात रक्तवाहिनीतील रक्त प्रवाहात गाठीमुळे अडथळा आला आहे. जरी ही समस्या फुफ्फुसाची वाटत असली तरी ती मूळ पायातील रक्तवाहिनीतून उद्भवते, हे उल्लेखनीय आहे. मानवी शरीरात, अशुद्ध रक्त हृदयात रक्तवाहिन्यातर्फे आणि त्यानंतर फुफ्फुसात पोहोचते. तेथे हे रक्त प्राणवायू घेते आणि नंतर धमन्यांच्या मार्फत पुन्हा हृदयात जाऊन मग शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

मात्र, काही लोकांमध्ये, पोटऱ्या आणि मांड्यांमध्ये लहान गाठी निर्माण होतात. यामुळे रक्ताभिसरणाची गती कमी होते, रक्तवाहिन्यांच्या भिंतीना इजा होते आणि रक्त घट्ट होते, आदी समस्या निर्माण होतात. जे लोक हात आणि पायांची हालचाल न करता अनेक तास बसून असतात, त्यांच्यासाठी ही समस्या जास्त उद्भवणारी असते. काहीवेळा, पायाच्या शिरांमध्ये निर्माण झालेल्या गाठी तिथून सरकतात आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांत अडकून बसतात. त्यामुळे, फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पुरेसा प्राणवायू न मिळालेले रक्त परत हृदयात येते. रक्तात पुरेसा प्राणवायू नसल्याने, श्वसन करण्यास त्रास होतो. फुफ्फुसे आकुंचन पावतात आणि छातीत वेदना होऊ शकतात.

जर रक्ताच्या गाठी असल्याची शंका आली तर, 'डी डायमर' नावाची तपासणी केली जाते. जर रक्तात गाठी असतील तर डॉक्टराना अंदाजाने समजते. जर गाठी लहान असल्याची शंका असेल तर, फुफ्फुसाचा अँजीओग्राम काढला जातो. जर आजार असल्याचे निश्चित समजले तर, हेपारीन नावाचे औषध सलाईनमध्ये मिसळून बराच वेळ दिले जाते. या गाठी नंतर वितळतात. हल्ली २४ तास काम करणारी हेपारीन(पोर्सीन) इंजेक्शन या दिवसांत उपलब्ध आहेत. समस्येची तीव्रता कमी झाल्यावर, हेपारीन गोळ्या देण्यात येतात, ज्या सहा महिने वापरल्या पाहिजेत. ही समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून अशा प्रकारे काळजी घेता येते.

हेही पहा : 'तुमच्या घरीच वावरत आहेत गुप्तहेर..'

जर आजार फारच जुनाट असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर मात्र अँन्जिओप्लास्टि करावी लागेल. यामध्ये,एक लहान नलिका मांडीच्या स्नायुतून घुसवून ती गाठीपर्यंत पोहचवली जाते आणि नंतर एन्झाइम इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर गाठीचे विघटन होते. जर तुमचे वडील अगोदरच हेपारीन गोळ्या घेत असतील तर, चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. या गोळ्या नेमक्या प्रमाणात घेतल्या पाहिजेत. जर प्रमाण अधिक असेल तर,

लहान जखम असेल तरीही रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळेच, डॉक्टर वारंवार ही तपासणी करतात आणि औषधाचे प्रमाण निश्चित करतात. पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे टाळायचे असेल तर, नियमित व्यायाम आवश्यक आहे. नेहमी कार आणि विमानातून प्रवास करणार्यांनी, मध्येच उतरून काही अंतर चालले पाहिजे. मांड्या आणि पोटर्यांवर दबाव येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

(हा लेख डॉ. आर. विजय कुमार यांनी लिहिला आहे. ते वरिष्ठ फुफ्फुसरोग तज्ञ आहेत.)

Intro:Body:

फुफ्फुसातील रक्ताच्या गाठींवर उपाय काय?

फुफ्फुसात रक्ताच्या गाठी का होतात? यावर उपाय काय आहे?असा आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? याबद्दल लिहित आहेत, वरिष्ठ फुफ्फुसरोग तज्ञ डॉ. आर. विजय कुमार.

फुफ्फुसात रक्ताच्या गाठी असणाऱ्या एका रुग्णाच्या मुलाने प्रश्न मांडला आहे..

प्रश्न : माझ्या वडिलांचे वय ५७ वर्षे आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. तपासण्या झाल्यानंतर, डॉक्टरानी सांगितले की, त्यांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. ही समस्या काय आहे? फुफ्फुसात रक्ताच्या गाठी का होतात? यावर उपाय काय आहे?असा आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? कृपया स्पष्ट करावे.

उपाय: हा आजार म्हणजे तुमच्या वडिलांना पल्मोनरी 'थ्रोम्बोइम्बोलीझम' म्हणजे फुफ्फुसात रक्तवाहिनीतील रक्त प्रवाहात गाठीमुळे अडथळा आला आहे. जरी ही समस्या फुफ्फुसाची वाटत असली तरी ती मूळ पायातील रक्तवाहिनीतून उद्भवते, हे उल्लेखनीय आहे. मानवी शरीरात, अशुद्ध रक्त हृदयात रक्तवाहिन्यातर्फे आणि त्यानंतर फुफ्फुसात पोहोचते. तेथे हे रक्त प्राणवायू घेते आणि नंतर धमन्यांच्या मार्फत पुन्हा हृदयात जाऊन मग शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

मात्र, काही लोकांमध्ये, पोटऱ्या आणि मांड्यांमध्ये लहान गाठी निर्माण होतात. यामुळे रक्ताभिसरणाची गती कमी होते, रक्तवाहिन्यांच्या भिंतीना इजा होते आणि रक्त घट्ट होते, आदी समस्य निर्माण होतात. जे लोक हात आणि पायांची हालचाल न करता अनेक तास बसून असतात, त्यांच्यासाठी ही समस्या जास्त उद्भवणारी असते. काहीवेळा, पायाच्या शिरांमध्ये निर्माण झालेल्या गाठी तिथून सरकतात आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांत अडकून बसतात. त्यामुळे, फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पुरेसा प्राणवायू न मिळालेले रक्त परत हृदयात येते. रक्तात पुरेसा प्राणवायू नसल्याने, श्वसन करण्यास त्रास होतो. फुफ्फुसे आकुंचन पावतात आणि छातीत वेदना होऊ शकतात.

जर रक्ताच्या गाठी असल्याची शंका आली तर, 'डी डायमर' नावाची तपासणी केली जाते. जर रक्तात गाठी असतील तर डॉक्टराना अंदाजाने समजते. जर गाठी लहान असल्याची शंका असेल तर, फुफ्फुसाचा अँजीओग्राम काढला जातो. जर आजार असल्याचे निश्चित समजले तर, हेपारीन नावाचे औषध सलाईनमध्ये मिसळून बराच वेळ दिले जाते. या गाठी नंतर वितळतात. हल्ली २४ तास काम करणारी हेपारीन(पोर्सीन) इंजेक्शन या दिवसांत उपलब्ध आहेत. समस्येची तीव्रता कमी झाल्यावर, हेपारीन गोळ्या देण्यात येतात, ज्या सहा महिने वापरल्या पाहिजेत. ही समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून अशा प्रकारे काळजी घेता येते.

जर आजार फारच जुनाट असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर मात्र अँन्जिओप्लास्टि करावी लागेल. यामध्ये,एक लहान नलिका मांडीच्या स्नायुतून घुसवून ती गाठीपर्यंत पोहचवली जाते आणि नंतर एन्झाइम इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर गाठीचे विघटन होते. जर तुमचे वडील अगोदरच हेपारीन गोळ्या घेत असतील तर, चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. या गोळ्या नेमक्या प्रमाणात घेतल्या पाहिजेत. जर प्रमाण अधिक असेल तर,

लहान जखम असेल तरीही रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळेच, डॉक्टर वारंवार ही तपासणी करतात आणि औषधाचे प्रमाण निश्चित करतात. पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे टाळायचे असेल तर, नियमित व्यायाम आवश्यक आहे. नेहमी कार आणि विमानातून प्रवास करणार्यांनी, मध्येच उतरून काही अंतर चालले पाहिजे. मांड्या आणि पोटर्यांवर दबाव येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

(हा लेख डॉ. आर. विजय कुमार यांनी लिहिला आहे. ते वरिष्ठ फुफ्फुसरोग तज्ञ आहेत.)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.