भारतीय राष्ट्रीय सौर उर्जा महासंघाचे(एनएसइएफआय) मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम पुलिपका यांनी इनाडूला दिलेल्या मुलाखतीत सौर उर्जेबाबत चर्चा केली. शेतीच्या बरोबरीने शेतजमिनीचा सौर उर्जेसाठी वापर केल्याने, शेतकरी अधिक लाभ मिळवू शकतात. अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रक्रियेला अग्रीव्होलटेक्स किंवा अग्रोफोटोव्होल्टेक्स किंवा सौर उर्जेचे वाटप म्हटले जाते. सध्या एनएसइएफआय तो विकसित करत आहे. अंतिम प्रकल्पाचा प्रस्ताव दोन महिन्यांत केंद्राला सादर केला जाईल.
आगळीवेगळी वैशिष्ट्ये - आंध्रप्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्यांत मिळून देशात एकूण निर्माण केल्या जात असलेल्या सौर उर्जेपैकी 15 टक्के सौर उर्जा निर्माण केली जाते. शेतकऱ्यांना एकच शेतजमिन सौर उर्जेसाठी आणि कृषीसाठी विकसित केल्याने लाभ होणार आहे. राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना या मार्गाने जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
अग्रीव्होलटेक्स पिके - कोरफड, गवती चहा, सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती, हिरव्या भाज्या आणि फळांची लागवड सौर पत्रांच्या खाली केली जाऊ शकते. उंचावर हे पत्रे उभारून, मोहरीसारख्या पिकांची वाढ केली जाऊ शकते. चिन, जर्मनी, फ्रान्स आणि इटाली हे देश या सौर पत्रांखाली फुलकोबी, कोबी आणि द्राक्षांसारख्या वनस्पतींचा विकास करत आहेत. या जमिनी भाड्याने किंवा भाडेपट्टीवरही दिल्या जाऊ शकतात.
सौर उर्जा वाटप म्हणजे काय - आतापर्यंत, सौर उर्जा प्रकल्प हे केवळ अकृषक जमिनींवरच उभारले जात होते. सौर पत्रे सहसा एक ते दीड फूट उंच असतात. अग्रोफोटोव्होल्टेक्समध्ये, हे सौरपत्रे उर्जा निर्मितीसाठी साधारणपणे समुद्रसपाटीपासून 3 ते 4 फूट उंचीवर बसवले जातात. नेहमीप्रमाणे शेती जमिनीवर केली जाते. ही रचना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ते अतिरिक्त वीज पॉवर ग्रिडकडे वळवून काही उत्पन्नमिळवू शकतात. याचा एक अतिरिक्त लाभही असा आहे की, सौर उर्जेचा पर्याय हा पर्यावरणस्नेही पर्याय आहे. त्याशिवाय, सौर उर्जेची निर्मिती ही पारंपरिक पद्धतींपेक्षा स्वस्तही आहे.
सौर पत्रे स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग सखल भागातील पिकांसाठीही करता येऊ शकतो. केंद्र सरकारने किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पीएमकुसूम) मोहिम सुरू केली असून तिचा उद्देष्य 2022 पर्यंत25,750 मेगावॉट सौर आणि इतर नवीकरणीय उर्जेची निर्मिती करण्याचा आहे. या योजनेचा भाग म्हणून 20 लाख ऑफ ग्रिड आणि 15 लाख ऑन ग्रिड पंप बसवले जाणार आहेत.
केंद्राचे लक्ष्य सौर उर्जेच्या माध्यमातून 2022 पर्यंत 100 गिगावॉट आणि 2030 पर्यंत 350 गिगावॉट उर्जा निर्मितीचे आहे. कृषक जमिनीचा उपयोग केला तर हे अधिक चांगल्या रितीने साध्य केले जाऊ शकते. 4 एकर जमिन 1 मेगावॉट सौर उर्जेची निर्मिती करू शकते. एक गिगावॉट उर्जेसाठी, 4 हजार एकर जमिनीची गरज असते.
संशोधन आणि अंमलबजावणी - एनएसइएफआयने जर्मनीच्या सहयोगाने अग्रीव्होल्टेक्समध्ये संशोधन केले आहे. एक टक्का कृषी जमिनीचा उपयोग करून, आम्ही 350 गिगावॉट सौर उर्जेची निर्मिती करू शकतो. आम्ही सध्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसंदर्भात परिणामकारक मार्गदर्शक तत्वे विकसित करत आहोत. जोधपूर येथील केंद्रिय शुष्क जमिन विभाग संशोधन संस्था अग्रिव्होल्टेक्सचा वापर करून वांगे, पडवळ, भेडी आणि कोरफडीची लागवड करत आहे. काही खासगी कंपन्याही या दिशेने पुढे निघाल्या आहेत. महिंद्रा समूहाने तेलंगणामधील तंदूर येथे अशा अग्रिव्होल्टेक प्रकल्प कार्यान्वित केला आहे.