ETV Bharat / bharat

हिमाचलमध्ये हिम बिबटे बनलेत पर्यटकांचे आकर्षण, वन विभागाच्या कॅमेऱ्यांनी टिपल्या हालचाली - हिमाचलमध्ये हिम बिबटे

देशात हिम बिबट्यांची संख्या 500 च्या आसपास आहे. एका अंदाजानुसार, हिमाचलमध्ये यांची संख्या 100 पर्यंत पोहोचली आहे. नेमकी ही संख्या किती आहे, हे त्यांच्या गणनेनंतरच समजू शकेल.

हिमाचलमध्ये हिम बिबटे बनलेत पर्यटकांचे आकर्षण, वन विभागाच्या कॅमेऱ्यांनी टिपल्या हालचाली

author img

By

Published : Feb 16, 2020, 8:49 PM IST

शिमला - हिमाचल प्रदेशातील आदिवासी जिल्हा लाहौल स्पीती येथील डोंगराळ भागांत हिम बिबटे (स्नो लेपर्ड) आढळून येत आहेत. डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या किब्बर चिचम, काजा या भागांसह लगतच्या डोंगरांमध्ये लुप्त होत चाललेला हा हिम बिबट्या आढळून आला आहे. शेकडो पर्यटक बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या या बिबट्यांना पाहण्यासाठी स्पीती दरीकडे येत आहेत.

स्पीती येथील पिन व्हॅली, नॅशनल पार्क, चंद्रताल वन्यजीव अभयारण्य आणि किब्बर वन्यजीव अभयारण्य येथील कॅमेऱ्यांनी बर्फाळ प्रदेशातील बिबट्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. वन विभागाने 'स्नो लेपर्ड'च्या हालचाली ट्रॅक करण्यासाठी अनेक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत.

हिमाचलमध्ये हिम बिबटे बनलेत पर्यटकांचे आकर्षण, वन विभागाच्या कॅमेऱ्याने टिपल्या हालचाली

मागील वर्षीही स्पीती दऱ्याखोऱ्यांमध्ये तब्बल 35 बिबटे कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, सध्या हिम बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामागे थंड प्रदेशात सापडणाऱ्या आयबेक्स आणि ब्लूशिपसारख्या प्राण्यांची संख्या वाढणे हे मुख्य कारण आहे. हे प्राणी येथील चराऊ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

वन विभागाने 2012 मध्ये 'प्रोजेक्ट स्नो लेपर्ड' च्या माध्यमातून बर्फाळ प्रदेशातील बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. तेव्हा या परिसरात चार हिम बिबटे आढळले होते. मात्र, आता स्पीतीबाहेर लाहौल घाटीमध्येही त्यांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा - फक्त देशाच्या हितासाठी! दडपण असतानाही सीएए, कलम ३७० सारख्या निर्णयांवर आम्ही ठाम

स्पीती घाटीमध्ये किब्बर वन्यजीव अभयारण्य सर्वांत मोठे आहे. याचे क्षेत्रफळ 2200 वर्ग किलोमीटरपर्यंत पसरले आहे. कुल्लूला लाहौलशी जोडणाऱ्या पिन व्हॅलीच्या वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ 675 वर्ग किलोमीटर आहे. तर, चंद्रताल वन्यजीव अभयारण्य 50 वर्ग किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे.

हिम बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. जवळजवळ 13 देशांमध्ये या बिबट्यांच्या संरक्षणासाठी अभियान सुरू आहे. भारताच्या हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या पाच राज्यांमध्ये हे बिबटे आढळतात. बर्फाळ प्रदेशातील बिबटे 'बिग कॅट' परिवारातील महत्त्वाची प्रजाती आहे. ती हिमालयातील उंच डोंगररांगांमध्ये सापडते.

देशात या बिबट्यांची संख्या 500 च्या आसपास आहे. एका अंदाजानुसार, हिमाचलमध्ये यांची संख्या 100 पर्यंत पोहोचली आहे. नेमकी ही संख्या किती आहे, हे त्यांच्या गणनेनंतरच समजू शकेल.

हेही वाचा - उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान..! ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार, सोशल मीडियावर 'त्याची'च चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.