ETV Bharat / bharat

'न्यायासाठी नाही, तर राजकारणासाठी राहुल गांधी हाथरस दौऱ्यावर' - स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडले. राहुल गांधी हे पीडितेला न्याय देण्यासाठी नाही, तर राजकारण करण्यासाठी हाथरसला जात आहेत, असे त्या म्हणाल्या.

स्मृती इराणी
स्मृती इराणी
author img

By

Published : Oct 3, 2020, 5:18 PM IST

वाराणसी - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडले. राहुल गांधी हे पीडितेला न्याय देण्यासाठी नाही, तर राजकारण करण्यासाठी हाथरसला जात आहेत. जनतेला काँग्रेसची रणनिती माहिती आहे. त्यामुळे 2019 मध्ये देशवासियांनी पुन्हा भाजपला निवडून दिले, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

हाथरस घटनेच्या पहिल्या दिवसापासून महिला विभाग पीडित कुटुंबाच्या संपर्कात आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल आणि दोषींना कठोर शासन करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. तथापि, स्मृती इराणी यांनी कृषी विधेयकावर भाष्य केले. कृषी विधयेके ही शेतकऱ्याच्या हिताची आहेत. यामुळे शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतील. शेतकरी हे देशाच्या पाठीचा कणा असून सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे त्या म्हणाल्या.

तथापि, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ आज उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने प्रियंका, राहुल गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्यास परवानगी दिली आहे.

हाथरसमधील दलित तरुणीवर गावातील चौघातरुणांनी बलात्कार केला तसेच तिला गंभीर जखमी केले. या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात या घटनेवरून आंदोलन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारवर विरोधक टीका करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.